महाराष्ट्र

गडकोट किल्ले प्रतिकृती साकारणाऱ्या चिमुकल्यांना प्रोत्साहनपर शैक्षणिक साहित्य भेट

भुदरगड दि. ३० :-  भुदरगड तालुक्यातील खानापूर येथे पर्यावरणमित्र अवधूत पाटील व कुटुंबियांनी दिवाळी सुट्टीत गडकोट किल्ले प्रतिकृती साकारणाऱ्या सहभागी मुलांना शैक्षणिक साहित्य भेट दिले.

दिवाळीच्या सुट्टीत गडकोट किल्यांची प्रतिकृती साकारत शिवकालीन इतिहास संस्कृती जपताना गडकिल्यांचे जतन व संवर्धनाचा संदेश देण्याचे महत्वपूर्ण कार्य लहान मुलांच्या हातून घडत असते. आजघडीच्या धावपळीच्या युगात छत्रपती शिवरायांचा दैदीप्यमान इतिहास मुलांच्या रोमारोमात उतरवण्याबरोबरच गडकोटांवरील नितांत श्रद्धा अबाधित ठेवण्यासाठी, इतिहास जागता ठेवणाऱ्या मुलांचा आत्मविश्वास व उत्साह द्विगुणित करण्यासाठी, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याबरोबरच वह्या, पेन, कंपास बॉक्स व पिगी बँक बॉक्स असे शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले.

प्रसंगी शिवप्रतिमा पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या रायगडावरील मातीचे पूजन, शिवगारद, शिवप्रेरणामंत्र पठण व सहभागी मुलांना शैक्षणिक साहित्य घरपोच भेट देण्यात आले. सदर उपक्रमाचे आयोजन अवधूत पाटील, क्षितिज पाटील, जान्हवी व मिथाली पाटील आदिनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button