रत्नागिरी

ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १ नोव्हेंबरला मुंबईत शोकसभा

जैतापूर दि. ३० (राजन लाड ) :- मालवणी रंगभूमीला समृद्ध करणारे आणि ‘वस्त्रहरण’ या नाटकाद्वारे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ नाटककार कै. गंगाराम गवाणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित शोकसभा मुंबईत शनिवार, दि. १ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता पार पडणार आहे.

ही शोकसभा अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, यशवंत नाट्य मंदिर – साळगावकर प्रायोगिक रंगमंच, मनमाला टँक रोड, माटुंगा-माहीम, मुंबई – ४०००१६ येथे होणार आहे. या सभेचे आयोजन माडबन गाव व पंचक्रोशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोकणचा अभिमान गंगाराम गवाणकर

गंगाराम गवाणकर हे कोकणातील नाट्यसृष्टीतील अतिशय मान्यवर आणि लोकप्रिय नाव होते. त्यांच्या ‘वस्त्रहरण’, ‘सुनबाई तोऱ्यात’, वन रूम किचन ,वात्रट मेले वडाची साल पिंपळाक यांसारख्या नाटकांनी मालवणी भाषेला आणि कोकणातील संस्कृतीला प्रतिष्ठेचे स्थान मिळवून दिले. त्यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ मराठी रंगभूमीची अखंड सेवा केली.

गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते आणि त्यांचं २७ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी निधन झालं. त्यांच्या जाण्याने कोकणातील रंगभूमीवर आणि साहित्यविश्वात एक शोककळा पसरली आहे.

या शोकसभेत नाट्य, साहित्य आणि कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ती, सहकारी कलाकार आणि चाहत्यांचा सहभाग अपेक्षित आहे.

कोकणच्या नाट्यपरंपरेला जीवनदान देणाऱ्या गंगाराम गवाणकर यांच्या स्मृतीस सर्व स्तरांतून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.

संपर्कासाठी

श्री. शैलेश द. वाघधरे – 8369872150

ऍड. दत्तराज द. शिरवडकर – 9820068263

श्री. भरत कणेरी – 9892442365

श्री. आबाजी गवाणकर – 9892599284

श्री. उमेश काजवे – 9221286130

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button