रत्नागिरी

ग्रामपंचायत निवडणूक जवळ येताच भाजपातील कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवण्याचा मित्र पक्षाचा घाट!

कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण

रत्नागिरी दि. २८ ऑगस्ट :- सध्या रत्नागिरीतील महायुतीत नक्की चाललंय काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणूक जवळ येताच भाजपातील कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवण्याचा घाट मित्र पक्षाकडून घातला जात असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

रत्नागिरी शहराजवळील नाचणे ही जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत मानली जाते. गेल्या काही महिन्यात या नाचणे भागात भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. नाचणे भागात भाजपा सक्षमपणे उभा राहत असल्याचे चित्र या भागात दिसून येत आहे.

अशावेळी नाचणे गावात मजबुतीने उभ्या राहणाऱ्या भाजपतील कार्यकर्ते आपल्याकडे कसे येतील असा घाट मित्र पक्षाकडून घातला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे भाजपातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. मित्र पक्षच आमचे कार्यकर्ते आपल्याकडे वळवत असतील तर अशा मित्र पक्षासोबत काम करायचे का, असा प्रश्न भाजपातील कार्यकर्त्यांना पडला आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या निवडणूक ही येणाऱ्या काळात महायुतीच्या माध्यमातूनच लढल्या जातील असेही बोलले जात आहे. त्यामुळे मित्र पक्षाने हे प्रकार थांबवावेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button