मनोरंजनरत्नागिरी

पुणे येथे संपन्न होणाऱ्या भक्ती बर्वे इनामदार नाट्य स्पर्धेसाठी स्टार थिएटर रत्नागिरी यांच्या तू पालनहारी या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड

रत्नागिरी दि. ६ सप्टेंबर :- पुणे येथील स्पेशल फोर्टी फेसबुक ग्रुप व ऑल इंडिया सीने वर्कर्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित भक्ती बर्वे इनामदार करंडक नाट्य स्पर्धेत रत्नागिरीच्या स्टार थिएटर रत्नागिरी यांनी निर्मिती केलेले अमेय धोपटकर लिखित आणि आप्पा रणभिसे दिग्दर्शित दोन अंकी नाटक तू पालनहारी या नाटकाची पुणे येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

सदरची नाट्य स्पर्धा ही राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा असून महाराष्ट्रभरातून एकूण 33 संघांनी या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये सहभाग नोंदवला होता स्पर्धेची प्राथमिक फेरी रेकॉर्डिंग लेव्हलवर पार पडली. प्राथमिक फेरीतील 33 नाटकांमधून अंतिम फेरीसाठी 9 नाटकांची निवड झाली आहे यामध्ये स्टार थिएटर रत्नागिरी च्या तू पालनहारी या नाटकाची देखील निवड झाली आहे.

तू पालनहारी या नाटकाचे वैशिष्ट्य असे आहे की सदर नाटकामध्ये एकूण 44 भूमिका असून या 44 भूमिका फक्त दोनच कलाकार सादर करतात. या 44 भूमिका सादर करणारे रत्नागिरीतील स्टार थिएटरचे अभिनेते श्री विलास जाधव आणि समीर इंदुलकर हे आहेत. सदर नाटकाचे नेपथ्य अत्यंत कल्पकतेने केले असून पूर्णपणे मोकळ्या असलेल्या रंगमंचावर केवळ शाडो प्ले चा आधार घेऊन मुंबईतील वेगवेगळी स्थळ नेपथ्यात मांडण्यात नेपथ्यकार श्री विनायक आपकरे आणि आकाश रणभिसे हे यशस्वी झाले आहेत.

सदर नाटकाचे पार्श्व संगीत श्री विशाल नाटेकर आणि संतोष सनगरे यांनी केले असून नाटकाचे ध्वनी संयोजन रत्नागिरी येथील ज्येष्ठ रंगकर्मी श्री चंद्रकांत आंबेरकर यांनी केले आहे. शाडो प्ले च्या नेपथ्याला साजेशी प्रकाश योजना रत्नागिरीतील सुप्रसिद्ध प्रकाश योजनाकार श्री अनिकेत गानू यांची आहे.

विविध 44 भूमिका साकारण्यात साठी लागणारी विविध प्रकारची वेशभूषा ज्येष्ठ रंगकर्मी श्री विजय पोकळे यांची असून या नाटकाचे रंगभूषाकार श्री निवराज मणचेकर हे आहेत. तसेच संपूर्ण नाटकाची रंगमंच व्यवस्था श्री अभिजीत डोंगरे यांनी केली आहे.

सदर नाटकाची पुणे येथील होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड होणे हे रत्नागिरी आणि कोकणासाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे नाटकाचे सूत्रधार आणि स्टार थिएटर चे खजिनदार श्री संजय कांबळे यांनी नमूद केले.

पुणे येथील भक्ती बर्वे इनामदार करंडक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झाल्याबद्दल *स्टार थिएटर चे सदस्य आणि सुप्रसिद्ध अभिनेते श्री मनोज कोल्हटकर आणि वैभव मांगले* यांनी नाटकाच्या पूर्ण टीमचे अभिनंदन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button