रत्नागिरी

सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन हर्षमय वातावरणात संपन्न

विल्ये दि. ६ सप्टेंबर (अमित कांबळे) :- रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावकर यांच्या शेतकरी,भूमिपुत्र व कामगारांच्या न्याय हक्कासाठी नव्याने उभारण्यात आलेल्या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ वाटद खंडाळा येथील उद्योजक शंकर घाणेकर व शेखरशेठ भडसावळे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

प्रथमेश गावणकर एक निर्भीड व्यक्तिमत्व आपल्या अभ्यासपूर्ण व विचारपूर्वक वक्तव्यांतून जनतेचे प्रश्न मांडणारे, प्रशासनाला जाब विचारून सर्वसामान्यांची कामे मार्गी लावण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणारे आणि वेळप्रसंगी सर्वसामान्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून त्यांचा हात व आवाज बुलंद करणारे तसेच गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देवून संघर्ष करत रत्नागिरीतील सर्वसामान्यांच्या आशेचा किरण ठरलेले जनहित फाऊंडेशन महाराष्ट्रचे संस्थापक तथा खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, रत्नागिरीची बुलंद तोफ आणि श्री. प्रथमेश दादा गावणकर यांचा वाढदिवस आणि त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाट्न कार्यक्रम निमित्त उपस्थित जनसमुदायाच्या माध्यमातून हर्षमय वातावरणात शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी त्यांच्या मातोश्री, भाऊ, भावजयी, पत्नी , जिजाऊ सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, महिला मंडळाच्या पदाधिकारी, विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

५ सप्टेंबर हा शिक्षक दिन आणि याच दिवशी श्री. गावणकर यांचा वाढदिवस. याच वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी एक नवीन संकल्प साकार करण्यासाठी निर्धार केला आहे, त्या करीता जनसमुदायाकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button