रत्नागिरी

‘नांदी’ साहित्य संमेलन संदर्भात चिपळुणात रंगणार साहित्यप्रेमी संवाद

चिपळूण दि. ६ सप्टेंबर :- मराठी साहित्याचा मर्मबंध जपणाऱ्या कोकणच्या सांस्कृतिक राजधानीत, चिपळूण नगरीत होणाऱ्या ‘नांदी’ साहित्य संमेलन संदर्भात चर्चा करण्यासाठी चिपळुणात सोमवारी दुपारी ३ वाजता लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात साहित्यप्रेमी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीला महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) पुणेचे केंद्रीय अध्यक्ष मा. योगेश सोमण, कोषाध्यक्ष मा. प्रदिप निफाडकर, मा. प्रशांत कुलकर्णी आणि मसापचे कोकण प्रतिनिधी मा. अरुण इंगवले हे उपस्थित राहणार आहेत.

जानेवारी २०२६ मध्ये पुणे येथे ऐतिहासिक १००वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचा मंगलारंभ म्हणजेच ठिकठिकाणी होणारी ९९ ‘नांदी संमेलने’ असून त्यातील एक संमेलन चिपळूण येथे घेण्याबाबत या बैठकीत विशेष चर्चा होईल. या निमित्ताने पाहुण्यांचा स्नेहगौरव आणि साहित्यिक संवाद रंगणार आहे.

या बैठकीचा तपशील…

दिनांक : सोमवार, ७ सप्टेंबर

वेळ : दुपारी ठीक ३:०० वाजता

स्थान : बाळशास्त्री जांभेकर सभागृह, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण.

मराठी भाषेचे ऐतिहासिक संमेलन पूर्व संमेलन यशस्वी करण्यासाठी चिपळूण परिसरातील सर्व साहित्यिक, वाचक, रसिक आणि साहित्यप्रेमींनी या सभेला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन प्रा. संतोष गोनबरे, अध्यक्ष मसाप शाखा चिपळूण यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button