रत्नागिरी

डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त खेड बस स्थानक व भरणे नाका येथे पथनाट्याद्वारे जनजागृती

रत्नागिरी दि. १५ जुलै : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जुलै २०२६ हा “डेंग्यू प्रतिरोध महिना” म्हणून विविध जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने तालुका आरोग्य विभाग, खेड यांच्या वतीने खेड बस स्थानक व भरणे नाका येथे डेंग्यू व मलेरिया प्रतिबंधाबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली.

या अभियानात एम.ई.एस. परशुराम नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी व प्राध्यापकांनी पथनाट्य सादर करून डेंग्यूची लक्षणे, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी, घर व परिसर स्वच्छ ठेवणे, साठवलेल्या पाण्याची नियमित तपासणी करणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणे तसेच ताप आल्यास तात्काळ शासकीय आरोग्य संस्थेत उपचार घेण्याबाबत नागरिकांना प्रभावी संदेश दिला.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यावर्षी डेंग्यू प्रतिरोध महिन्याचे घोषवाक्य “डेंग्यू नियंत्रणासाठी लोकसहभाग : साठवलेल्या पाणीसाठ्यांची तपासणी करा, स्वच्छता राखा आणि ती भांडी झाकून ठेवा” असे असून, डेंग्यू नियंत्रणासाठी लोकसहभागाचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती खेडच्या सभापती मा. डॉ. आफिया नजीब पालेकर, गटविकास अधिकारी श्री. विजय करपे, पंचायत समिती सदस्य श्री. संग्राम सतीश कदम, श्री. प्रशांत पांडुरंग चव्हाण, श्री. निसार जाफर सुर्वे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश खरटमोल, आरोग्य विस्तार अधिकारी श्री. रमेश महाडिक, श्रीमती गोरे, आरोग्य सेवक श्री. अजित तटकरी, आरोग्य सहाय्यक श्री. घाडगे, श्री. विकास जाधव, श्री. अभय देसाई, आरोग्य सेवक श्री. गुरव, श्री. केदार, क्षेत्रीय कर्मचारी श्री. सचिन जाधव, आशा सेविका तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी पंचायत समिती सभापती डॉ. आफिया नजीब पालेकर, गटविकास अधिकारी विजय करपे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश खरटमोल यांनी नागरिकांना आवाहन केले की, डेंग्यू प्रतिबंधासाठी प्रत्येकाने आपल्या घराच्या व परिसरातील पाणीसाठ्यांची नियमित तपासणी करून स्वच्छता राखावी, पाण्याची भांडी झाकून ठेवावीत, डासांची उत्पत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच ताप, अंगदुखी किंवा डेंग्यूची लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत वैद्यकीय सल्ला व उपचार घ्यावेत. लोकसहभागातूनच डेंग्यूमुक्त समाज निर्माण करणे शक्य आहे. या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

-डॉ शैलेश खरटमोल, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका खेड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button