रत्नागिरी

माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा खंडाळा व श्रीम.पा.शं. बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा येथे विविध उपक्रमातून गुरुपौर्णिमा साजरी

विल्ये दि. १ ऑगस्ट (अमित कांबळे) :- माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा खंडाळा व श्रीम.पा.शं. बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा येथे नुकताच गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्या. श्री. जगताप सर, श्री. सरगर सर, डॉ. श्री. राजेश जाधव सर, प्रा.मुसळे सर आणि नॅशनल कॉम्प्युटर सेंटरचे अमर मोहित सर, यांनी महापुरुषांना पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.

उपस्थित मान्यवरांचे इयत्ता – ९ वी क च्या विद्यार्थीनीनी स्वागत गीत सादर करत शब्दसुमनाने स्वागत केले.अनेक शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून गुरुपौर्णिमा तसेच गुरुंचे महत्व अधोरेखित केले. गुरुपौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम शिक्षक पालक संघाचे माजी उपाध्यक्ष श्री. संदिपशेठ विचारे, मुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

इयत्ता ५ वी ते ७ वी गटातून कु. पियुषा पद्माकर आडेकर – प्रथम क्रमांक, कु. स्वरा संतोष मुंडे – द्वितीय क्रमांक, कु. निशांत प्रशांत तुपट – तृतीय क्रमांक आणि कु. शौर्य सिनेश चव्हाण – उत्तेजनार्थ. इयत्ता ८ वी ते १० वी च्या गटातून कु. मृणाली मधुकर पाष्टे – प्रथम क्रमांक, कु. रितेश जानू गोताड-द्वितीय क्रमांक, कु. सत्यम कडप्पा पुजारी – तृतीय क्रमांक तर कु. सना अजय रेड्डी आणि कु. नैतिक निलेश निंबरे – उत्तेजनार्थ तसेच ११ वी, १२ वी च्या गटातून कु. मनस्वी मनोहर किंजळे – प्रथम क्रमांक, कु. पुर्वा प्रकाश बारगोडे – द्वितीय क्रमांक, कु. श्रुती उदय वझे – तृतीय क्रमांक तर कु. राज प्रमोद रहाटे – उत्तेजनार्थ या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत यश संपादन केले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. राजेश जाधव सर, श्री. बलेकर सर, श्रीम. बोरकर मॅडम, श्री. कांबळे सर, श्री. धोपट सर आणि सौ. गावडे मॅडम यांनी काम पाहिले.

बक्षिस वितरण कार्यक्रमानंतर इयत्ता – आठवीच्या विद्यार्थीनींनी सुंदर कराओके गीत सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी गुरुंचा आदर्श घेऊन जीवनाची वाटचाल करावी हा महत्त्वाचा संदेश आपल्या भाषणातून प्रमुख वक्ते प्रा. मुसळे सरांनी उपस्थितांना दिला.

परीक्षक श्री. धोपट सरांनी वक्तृत्व स्पर्धेसंदर्भात आपले विचार मांडले. शेवटी मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. शिवाजी जगताप सर यांनी गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. वरवडे गावचे सुपुत्र तसेच शिक्षक पालक संघाचे माजी उपाध्यक्ष श्री. संदिपशेठ विचारे आणि सुरेश इलेक्ट्रॉनिक्स खंडाळाचे मालक श्री. सुरेश चौघुले यांनी वक्तृत्व स्पर्धेसाठी लागणारी बक्षिसे दिली. त्याबद्दल संस्था व शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन तसेच सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. एस्. के. जाधव सर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत उत्तमरित्या केले.या कार्यक्रमासाठी मुख्या. श्री. जगताप सर, पर्यवेक्षक श्री. पाटील सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी गोविंद मांजरेकर, मंगला चावरे, विशाखा निवळकर तसेच इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button