रत्नागिरी

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम; राज्यात चिपळूण, दापोली, गुहागर विधानसभा मतदारसंघ अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा

रत्नागिरी, दि. ३१ जुलै : भारत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम SIR 100 टक्के कामकाज पूर्ण करुन राज्यात अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक जिल्ह्यातील चिपळूण, दापोली आणि गुहागर या तीन विधानसभा मतदारसंघांनी मिळवला आहे. अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिली.*

265- चिपळूण विधानसभा मतदार संघ 100 टक्के मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कामकाज करुन राज्यात पहिला ठरला आहे. 263- दापोली विधानसभा मतदारसंघ हा राज्यात दुसरा तर 264-गुहागर मतदारसंघ हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

जिल्ह्यातील 267- राजापूर विधानसभा मतदार संघाचे 98.76 टक्के तर 266- रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे 91.38 टक्के आज अखेर मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण अंतर्गत कामकाज झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button