रत्नागिरी

माझ गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत लिंग आधारित हिंसाचार विषयावर जनजागृती कार्यक्रम संपन्न

दादासाहेब सरफरे विद्यालयात आयोजन

संगमेश्वर दि. ३१ ( प्रतिनिधी ):- महाराष्ट्र शासनाच्या “माझगाव आरोग्य संपन्न गाव” अभियानांतर्गत उपकेंद्र कोसुंब येथे एप्रिल २०२६ पासून विविध आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाच्या सुरुवातीला कृती समितीची स्थापना करण्यात आली.

त्यानंतर आरोग्य जनजागृती, तंबाखूविरोधी अभियान, जलजन्य, कीटकजन्य, पावसाळ्यात होणारे, आजारांविषयी जनजागृती, किशोरी मुलींची तपासणी मार्गदर्शन, कॅन्सर चेकिंग कॅम्प, एनसीडी(मधुमेह, उच्च रक्तदाब) तपासणी, गावातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन तसेच नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित समस्या व अडचणींवर समितीच्या बैठकीत चर्चा करून त्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.या अभियानाचाच एक भाग म्हणून जुलै महिन्यात दादासाहेब सरफरे हायस्कूलमध्ये “लिंग आधारित हिंसाचार – प्रतिबंध व कायदेशीर संरक्षण” या विषयावर विशेष जनजागृती व्याख्यान आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमात ॲड. पुनम जाधव आणि ॲड. शोभा चव्हाण मॅडम यांनी विद्यार्थ्यांना किशोरावस्था, मुला-मुलींचे परस्पर संबंध, लिंग आधारित हिंसाचाराचे प्रकार, त्यावरील कायदेशीर संरक्षण तसेच सुरक्षित आणि जबाबदार वर्तन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.किशोर अवस्थेमध्ये होणारे बदल आणि त्याला कसे आपण सामोरे जायचे आणि आरोग्य शिक्षण यावरती , ऋतुजा अजय शिंदे समुदाय आरोग्य अधिकारी यांनी माहिती दिली

या कार्यक्रमाला निर्मल ग्रामपंचायत माननीय सरपंच दिनेश जाधव सर शिवणे गावाचे सरपंच मारुती पवार सर, उपकेंद्र कोसुंब अंतर्गत कार्यरत सर्व आरोग्य कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच जनजागृतीपर उपक्रमांचे स्वागत करून समाजात आरोग्यदायी, सुरक्षित व हिंसामुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button