श्रीमान मंगेश बापुजी तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

रत्नागिरी दि. ३ : र. ए. सोसायटीच्या श्रीमान मंगेश बापुजी तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
र. ए. सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष मनोज पाटणकर आणि उपमुख्याध्यापिका सौ. पूनम पवार प्रमुख उपस्थित होत्या. या वेळी विज्ञान शाखेत प्रथम सिद्धी चंद्रकांत पागडे, द्वितीय राजवीर रामकांत जाधव, तृतीय महर्ष मिलिंद आडिवरेकर, वाणिज्य शाखेत प्रथम श्रावणी आदेश नागवेकर, द्वितीय मानसी प्रशांत नाईक, तृतीय सिद्धी प्रदीप पड्याळ यांचा पुष्पगुच्छ व रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
प्रास्ताविक सौ. दीप्ती पंडित यांनी केले.सूत्रसंचालन सौ. मिहिका कार्लेकर यांनी केले. या कार्यक्रमात माजी मुख्याध्यापिका सौ. गायत्री गुळवणी, सौ. सोनल गुळवणी, सी.ए. उमेश लोवलेकर, मुख्याध्यापक के. डी. कांबळे, उपमुख्याध्यापिका सौ. पूनम पवार, पर्यवेक्षिका सौ. पुष्पा कांबळे, ज्येष्ठ शिक्षक आणि मनोज पाटणकर यांच्या सहकार्यातून बक्षिसे देण्यात आली. गुणवंत विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सौ. अनुपा पोतकर यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास शिक्षक, पालक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



