रत्नागिरी

कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यालयात दहीहंडी उत्साहात

रत्नागिरी दि. ५ सप्टेंबर : भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यालयात दहीहंडीचा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी फेर धरून श्रीकृष्णाच्या गीतांवर विविध नृत्ये सादर केली.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळेच्या परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या वेळी विद्यार्थिनींनी सादर केलेल्या टिपरी नृत्याने उपस्थितांची विशेष दाद मिळवली. त्यानंतर बालगोविंदांनी उत्साहात दहीहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला. विशेष म्हणजे दहीहंडीचा उत्सव सुरू असतानाच पावसानेही हजेरी लावल्याने कार्यक्रमाचा उत्साह आणखी वाढला.

या कार्यक्रमाला भारत शिक्षण मंडळाचे विश्वस्त विनायक हातखंबकर, मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांच्यासह सर्व शिक्षक, पालक आणि कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्साहाला प्रोत्साहन देत उपस्थितांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. या सर्व उपक्रमांमध्ये पालकांनी दहीहंडी सजवण्यासाठी मदत केली दहीहंडी झाल्यानंतर सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षकांना लाडू, फळे व पोह्यांचा प्रसाद देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button