रत्नागिरी
कर्ली-देवघर तंटामुक्त अध्यक्षपदी नारायण घाणेकर यांची निवड

देवरुख दि. ५ सप्टेंबर (सुरेश सप्रे) :- देवरुख जवळील ग्रुप ग्रामपंचायत कर्ली- देवघर- महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्ष पदावर देवघर गावातील नारायण बाबू घाणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे
ग्राम समिती मौजे कर्ली देवघर ग्रुपग्रामपंचायती मध्ये झालेल्या ग्राम सभेमध्ये देवघर येथील कुणबी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते.व कर्ली देवघरचे माजी उपसरपंच राहीलेले नारायण घाणेकर यांची तंटामुक्त अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा एकमताने निवड करण्यात आलेवर त्यांचे सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ग्राम सभेसाठी प्रशासक पारशे. ग्रामसेवक विवेक चौगुले, माजी सरपंच प्रदिप रावनंग, नागेश चाळके समिर चाळके, विश्वनाथ चौरे आदीसह दोन्ही गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.



