रत्नागिरी

देवरूखचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक उदय झावरे यांना उपअधिक्षकपदी बढती

देवरुख दि. २४ (सुरेश सप्रे) :- देवरूखचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक उदय झावरे यांना उपअधिक्षकपदी बढती पदोन्नती देण्यात आली आहे.

देवरूखमध्ये पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्विकारल्यापासून ते आजपर्यंत श्री. उदय झावरे यांनी अतिशय चांगली कामगिरी केली. कडक शिस्तीचे व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून श्री. उदय झावरे यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

देवरूखचे पोलीस निरीक्षक म्हणून काम करत असताना श्री. उदय झावरे यांनी अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्याची कौतुकास्पद कामगिरी बजावली. देवरुखच्या केतकर ज्वेलर्सच्या मालकांवर टाकलेल्या दरोड्यातील आरोपीना त्यांच्या नेतृत्वाखाली तातडीने शोधुन ताब्यात घेण्यात आले होते.

येत्या २७ जूनला देवरूखच्या पोलीस निरीक्षकपदाची जबाबदारी स्विकारून त्यांना एक वर्ष पुर्ण होणार होते; आता त्यांना राज्याच्या गृह विभागामार्फत सेवा जेष्ठतेनुसार रायगडमध्ये पोलीस उपअधिक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button