महाराष्ट्र

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी ‘सिंहस्थ कुंभमेळा २०२७’; बोधचिन्हाच अनावरण

नाशिक दि. १३ :-  नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी ‘सिंहस्थ कुंभमेळा २०२७’ च्या तयारीने आता वेग घेतला असून आज या महापर्वाच्या अधिकृत बोधचिन्हाच अनावरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे, ग्रामविकास व पर्यटन मंत्री श्री.गिरीशजी महाजन, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्यासह राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत उपस्थित होते.

या सोहळ्यात त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधील विविध आखाड्यांचे महंत, साधू-संत आणि पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलतांना, सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक उत्सव नसून आपल्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा सोहळा आहे. भाविकांच्या सोयीसाठी आणि कुंभमेळ्याच्या भव्य आयोजनासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. हे बोधचिन्ह आपल्या वैभवशाली परंपरेचे प्रतीक ठरेल, असा विश्वास ना. उदय सामंत यांनी व्यक्त केला.

यावेळी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधील विविध आखाड्यांचे महंत, साधू-संत आणि पुरोहित संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button