कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी : आजपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणार नियमित एक्सप्रेस ट्रेन!
खासदार नारायणराव राणे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश!

मुंबई दि. ३ सप्टेंबर :- कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (vc द्वारे), केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल ( vc द्वारे), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मत्स्य व बंदरे तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महापौर रितू तावडे यांनी यावेळी झेंडा दाखवला.
कोकणवासीयांसाठी ही रेल्वे सुरू व्हावी यासाठी खासदार नारायणराव राणे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांचा पाठपुराव्यामुळे ही गाडी आज कोकण रेल्वे मार्गावर मार्गस्थ झाली. यामुळे कोकणवासियांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे.
सदरची रेल्वेगाडी क्रमांक 15087 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 15088 सावंतवाडी रोड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस या नावांनी दररोज धावेल.
थांबे :-
दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे , आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली , विलवडे , राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड.



