रत्नागिरीसामाजिक

सोलारिस हॉस्पिटल, रत्नागिरी नगर परिषद यांच्या सहकार्याने रत्नागिरीकरांसाठी न्यूरॉलॉजी व मणक्यांच्या आजारांवरील मोफत वैद्यकीय शिबिराचे १७ मे रोजी आयोजन

रत्नागिरी दि. १३ :- सोलारिस हॉस्पिटल, रत्नागिरी नगर परिषद यांच्या सहकार्याने रत्नागिरीकरांसाठी न्यूरॉलॉजी व मणक्यांच्या आजारांवरील मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन, येत्या रविवार, दिनांक १७ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० या वेळेत आर. बी. शिर्के हायस्कूल, सन्मित्र नगर, रत्नागिरी येथे आयोजन करण्यात आले आहे.

सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने अत्याधुनिक न्यूरो नेव्हिगेशन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने १०० हून अधिक मेंदूमध्ये गाठी (ब्रेन ट्यूमर) झालेल्या रुग्णांना  “जीवनदान” दिले असून, रुग्णांसाठी हे एक वरदान  ठरले आहे.

डोकेदुखी आणि दृष्टी कमी होणे ही मेंदूतील गाठीची लक्षणे असू शकतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका असे आवाहन ठाणे येथील सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे. अत्याधुनिक न्यूरो नेव्हिगेशन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सोलारिस हॉस्पिटलने आतापर्यंत १०० हून अधिक मेंदूमध्ये गाठी झालेल्या रुग्णांना “जीवनदान” दिले असून सर्व रुग्णांची प्रकृती अत्यंत चांगली आहे. हीच नेव्हिगेशन तंत्रज्ञान प्रणाली मणक्यांच्या शस्त्रक्रियांसाठीही वापरण्यात येत आहे. या तंत्रज्ञानामुळे मणक्यात स्क्रू अधिक अचूकपणे बसविण्यास मदत होते. स्पाईन फिक्सेशन शस्त्रक्रियेदरम्यान स्क्रू कोणत्या दिशेने आणि कोणत्या आकाराचे बसवायचे याचे अचूक मार्गदर्शन या तंत्रज्ञानाद्वारे शल्यचिकित्सकांना मिळते.

सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. दीपक ऐवळे आणि डॉ. अमित ऐवळे यांनी सांगितले की, “डोकेदुखी, दृष्टी कमी होणे तसेच महिलांमध्ये होणारे हार्मोनल बदल या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. ही मेंदूतील गाठीची लक्षणे असू शकतात. तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.” मेंदूतील गाठ काढण्यासाठी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक न्यूरो-नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या तंत्रज्ञानाद्वारे नाकावाटे गाठ काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही अत्यंत कमी छेदाची (मिनिमली इन्व्हेसिव्ह) शस्त्रक्रिया असून यामध्ये मेंदू अजिबात उघडला जात नाही. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यासाठी नेत्ररोगतज्ज्ञ, ईएनटी तज्ज्ञ, महिला रुग्णांच्या बाबतीत स्त्रीरोगतज्ज्ञ, एंडोक्रायनॉलॉजिस्ट तसेच न्यूरोसर्जन अशा विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या समन्वयाची आवश्यकता असते. सोलारिस हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. दीपक ऐवळे (न्यूरॉलॉजिस्ट) आणि डॉ. अमित ऐवळे (न्यूरोसर्जन) या दोन्ही बंधूंनी हे सर्व वैद्यकीय विभाग एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्यामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत सुलभ झाली. यामुळे रुग्णांची दृष्टी पुन्हा पूर्ववत करण्यात तसेच कानाशी संबंधित समस्या दूर करण्यात यश मिळाले आहे. गेल्या अडीच वर्षांत सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने अत्याधुनिक न्यूरो-नेव्हिगेशन तंत्रज्ञान आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह प्रक्रियेच्या सहाय्याने मेंदूतील गाठीने ग्रस्त १०० हून अधिक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत.

सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे रत्नागिरी नगर परिषद यांच्या सहकार्याने न्यूरॉलॉजी आणि मणक्यांच्या आजारांवरील मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांना दीर्घकालीन डोकेदुखी, चक्कर येणे, व्हर्टिगो, फिट्स, नैराश्य, चिंता, पाठदुखी, मानदुखी, मेंदू व मणक्यांच्या गाठी, न्यूरोपॅथी, हालचाल व संतुलनाशी संबंधित विकार, मायस्थेनिया ग्रॅव्हिस आदी समस्या आहेत. अशा रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिड-टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ अर्बानिया, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे मोफत वैद्यकीय शिबिर रविवार, १७ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० या वेळेत आर. बी. शिर्के हायस्कूल, सन्मित्र नगर, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहे. नोंदणीसाठी श्री. विवेक महाकाळ ८६५५६९६४९६ / श्री. पुरुषोत्तम पवार ८४३३५२९४३५ यांच्याशी संपर्क साधावा.

सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक आणि प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. अमित ऐवळे म्हणाले, “आम्ही ट्यूमर काढण्यासाठी न्यूरो-नॅव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर केला. न्यूरो नॅव्हिगेशन हे मेंदूसाठी जीपीएससारखे आहे, ते रिअल-टाइम इमेजिंगच्या मदतीने शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना ट्यूमर किंवा समस्या असलेल्या भागांवर अचूकपणे लक्ष्य साधण्यासाठी मार्गदर्शन करते. हे प्रगत तंत्रज्ञान मेंदूची शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित, कमी गुंतागुंतीची आणि अधिक अचूक बनवते, तसेच महत्त्वाची कार्ये सुरक्षित ठेवते आणि रुग्णाचे आरोग्य सुधारते. न्यूरो नॅव्हिगेशनमुळे रुग्णांना उत्तम अचूकता, कमीत कमी छेद, कमी आघात आणि जलद बरे होण्यास मदत होईल. मेंदूच्या ट्यूमरच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना लवकर घरी सोडले जाऊ शकते. अत्यंत गुंतागुंतीच्या शारीरिक रचनेत शस्त्रक्रियेच्या उद्दिष्टांशी सुसंगत राहण्यासाठी नॅव्हिगेशन तंत्रज्ञान प्रत्येक टप्प्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना मदत करते. हे उपकरण रुग्णांसाठी एक वरदान आहे. मेंदूमधील ट्यूमरच्या शस्त्रक्रियांव्यतिरिक्त, हे नॅव्हिगेशन उपकरण मणक्याच्या शस्त्रक्रियांमध्येही अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे स्क्रू चुकीच्या जागी बसणे, सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड गळती, ड्युरल इजा इत्यादींशी संबंधित गुंतागुंत कमी होण्यास मदत होते. मणक्याची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर ६ तासांच्या आत लक्षणीय सुधारणेसह हालचाल करता येते.”

ब्रेन ट्यूमर आणि मणके या दोघांवर शस्त्रक्रिया करणारे न्यूरोसर्जन डॉ. अमित ऐवळे यांनी नाकावाटे गाठ काढण्याची शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेला एंडोस्कोपिक एंडोनाझल पिट्यूटरी ट्यूमर एक्सिजन सर्जरी असे म्हटले जाते. ही अत्यंत कमी छेदाची (मिनिमली इन्व्हेसिव्ह) शस्त्रक्रिया आहे. पिट्यूटरी ग्रंथीमध्ये होणाऱ्या गाठीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बहुतांश पिट्यूटरी अॅडेनोमा हे कर्करोग नसलेले, परंतु पिट्यूटरी ग्रंथीतील असामान्य वाढीमुळे निर्माण होणारे ट्यूमर असतात. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या माहितीनुसार, पिट्यूटरी अॅडेनोमा होण्यासाठी जीवनशैली किंवा पर्यावरणाशी संबंधित ठोस कारणे आढळून आलेली नाहीत. या उपचार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रुग्णांच्या प्रकृतीवर पुढील अनेक महिने आणि वर्षे नियमित लक्ष ठेवणे आवश्यक असते. शस्त्रक्रियेनंतर न्यूरोसर्जनकडून रुग्णांची नियमित तपासणी केली जाते. थकवा, पचनसंस्थेशी संबंधित त्रास, पित्ताशयातील खडे तसेच दृष्टीसंबंधी समस्या यांसारख्या लक्षणांबाबत डॉक्टरांशी चर्चा करणे महत्त्वाचे असल्याचेही डॉ. अमित ऐवळे यांनी सांगितले.

सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक आणि भारतातील प्रख्यात न्यूरॉलॉजिस्ट डॉ. दीपक ऐवळे म्हणाले, “पिट्यूटरी अॅडेनोमा हे तुलनेने सामान्य प्रकारचे ट्यूमर असून मेंदूतील एकूण गाठींपैकी सुमारे १० ते १५ टक्के गाठी या प्रकारातील असतात. भारतात दरवर्षी पिट्यूटरी अॅडेनोमाचे १० लाखांहून अधिक रुग्ण आढळून येतात. गाठीचा आकार आणि स्थान यानुसार हार्मोनल असंतुलन, डोकेदुखी आणि दृष्टीसंबंधी समस्या अशी विविध लक्षणे दिसू शकतात. एंडोस्कोपिक एंडोनाझल पिट्यूटरी ट्यूमर एक्सिजन सर्जरी ही या गाठी काढण्यासाठी अधिक पसंतीची पद्धत मानली जाते, कारण ही अत्यंत कमी छेदाची शस्त्रक्रिया आहे. या प्रक्रियेत कवटी उघडण्याची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे गुंतागुंतीचा धोका कमी होतो आणि रुग्णांची रिकव्हरी अधिक वेगाने होते.”

अवघ्या तीन वर्षांच्या अल्प कालावधीत सोलारिस हॉस्पिटलने न्यूरॉलॉजी क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून हे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल वेगाने प्रगती करत आहे. न्यूरॉलॉजिस्ट डॉ. दीपक ऐवळे आणि न्यूरोसर्जन डॉ. अमित ऐवळे या दोघांनी मिळून अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे जागतिक दर्जाचे हॉस्पिटल उभारले आहे. या हॉस्पिटलमध्ये नाशिक, नांदेड, धुळे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आदी महाराष्ट्रातील विविध भागांतून रुग्ण उपचारासाठी येतात.

अधिक माहितीसाठी पुष्कला एस. यांच्याशी ८४३३५२९७६९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button