रत्नागिरी

आंबा बागायतदारांना चर्चेसाठी सरकारचे निमंत्रण; सरकारची सकारात्मक भूमिका

रत्नागिरी दि. १३ :- आंबा काजू शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असून, आंबा बागायतदारांना चर्चेसाठी सरकारचे निमंत्रण दिले आहे.

शेतकरी नेते राजू शेट्टी, ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव विनायक राऊत, काँग्रेसचे आमदार भाई जगताप, माजी आमदार बाळ माने यांना सरकारकडून चर्चेचे निमंत्रण देण्यात आले आहे.

आज दुपारी तीन वाजता होणार सरकार आणि आंबा बागायतदारांमध्येदारांमध्ये होणार बैठक आहे. आंबा काजू शेतकऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या तुटपुंजा मदतीवरून आंबा शेतकरी आक्रमक झाले होते. १५ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मोर्चा काढण्यात येणार होता.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे, काँग्रेस यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button