नगरपालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज

मुंबई दि. २८ :- राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या मतदानासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी सुमारे 13 हजार 355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.
या निवडणुकांसाठी ईव्हीएम मशीनचा व्यवस्था करण्यात आली असून त्यात 13 हजार 726 कंट्रोल युनिट आणि 27 हजार 452 बॅलेट युनिटची उपलब्धता करण्यात आली आहे. राज्यातील 246 नगरपरिषदा तर 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 2 डिसेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. तर मतमोजणी 3 डिसेंबरला सकाळी 10 वाजेपासून सुरु होणार आहे.



