रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदारांना सेवा पदके जाहीर

रत्नागिरी दि. १४ ऑगस्ट :- भारत सरकार, गृह मंत्रालय यांच्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र राज्याचे माननीय पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयामार्फत महाराष्ट्र पोलीस दलात आपल्या दीर्घकालीन व निष्कलंक उत्कृष्ट सेवेची दखल घेऊन प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील खालील नमूद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांनी केलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल “अति उत्कृष्ट सेवा पदक” / “उत्कृष्ट सेवा पदक” या करिता निवड करण्यात आलेली आहे.

“अति उत्कृष्ट सेवा पदक” 2026

१) पोलीस निरीक्षक श्री. नीलकंठ बगळे, लांजा पोलीस ठाणे

२) पोलीस निरीक्षक श्री. नितीन दत्तात्रय ढेरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा

३) श्रेणी पो.उ.नि श्री. काशीनाथ महादेव गुरव, पोलिस मुख्यालय

४) श्रेणी पो.उ.नि श्री. संजय शिवाजी साळवी, लांजा पोलीस ठाणे

५) म.पो.हवा / 57 निशा दीपक केळकर, जिल्हा विशेष शाखा

६) म.पो.हवा/1057 वैदेही विनोद कदम, पोलिस मुख्यालय

७) पो.हवा/829 महेश दगडू गुरव, जिल्हा विशेष शाखा

८) पो.हवा/409 आशीष वसंत शेलार, लांजा पोलीस ठाणे

“उत्कृष्ट सेवा पदक” २०२६

१) पोलीस निरीक्षक श्री. अमित आनंदराव यादव, राजापूर पोलीस ठाणे

२) पोलीस निरीक्षक श्री. फुलचंद भगवानराव मेंगडे, चिपळूण पोलीस ठाणे

३) पो.हवा/909 विजय तानाजी आंबेकर, स्था.गु.अ.शा.

४) पो.हवा/1265 अमोल अरुण गमरे, जिल्हा विशेष शाखा

या पदकांसाठी निवड झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी गुणवत्तापूर्ण सेवा बजावली आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन स्वातंत्र्यदिनानिमित्त दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित पदक प्रदान समारंभात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील या सर्व पदकप्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सन्मान करण्यात येणार आहे.

पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. बी. बी. महामुनी यांनी सर्व पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button