रत्नागिरी

भिले कुंभारवाडीत विकासाची नवी पहाट!

आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने विहीर बांधकामाच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

चिपळूण दि. २८ :- कोयना भूकंप पुनर्वसन योजनेअंतर्गत भिले कुंभारवाडी येथील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विहिरीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा अतिशय मंगलमय आणि भावनिक वातावरणात पार पडला. गावाच्या पाण्यासारख्या मूलभूत गरजेची पूर्तता होत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण होते. या कामासाठी आमदार शेखर निकम यांनी घेतलेला पुढाकार आणि मिळवून दिलेली मंजुरी याबद्दल ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमाला नितीन ठसाळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. ग्रामपंचायत उपसरपंच उमेश सकपाळ, माजी सरपंच सुभाष गुडेकर, बाबू वाजे, सोमनाथ जाधव, पंकज जाधव, अथर्व जाधव, माजी उपसरपंच हरिचंद्र गुडेकर, वसंत शंकर गुडेकर, सोमा गुडेकर, गंगाराम गुडेकर, बाळा गुडेकर, सुरेश (बावाशेठ) गुडेकर, मंडळ अध्यक्ष रुपेश गुडेकर, भरत गुडेकर, श्रीकृष्ण गुडेकर, दत्ताराम रोंगु गुडेकर, सिधू दिविलकर, रघुनाथ गुडेकर, चंद्रकांत गुडेकर, अरविंद गुडेकर, विनोद गुडेकर, प्रभाकर गुडेकर, वसंत बाबाजी गुडेकर, राजेंद्र गुडेकर, मुकुंद गुडेकर, दत्ताराम गुडेकर, पांडुरंग गुडेकर, बळीराम गुडेकर, गुणाजी गुडेकर, विजय गुडेकर, अरविंद गुढेकर यांनी सहभाग नोंदवला.

महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. महिला मंडळ अध्यक्षा सौ. शारदा भिकाजी गुडेकर, सावित्री गुडेकर, सपना गुढेकर, वैष्णवी गुडेकर, प्रमिला गुडेकर, रोशनी गुडेकर, रंजना चिपळूणकर, मधुरा जामसुतकर, शितल गुडेकर, लक्ष्मी सोमा गुडेकर, सुजाता गुडेकर, सायली गुडेकर, सुरेखा गुडेकर, सुगंधा गुडेकर, साक्षी गुडेकर आदींच्या उपस्थितीमुळे सोहळा अधिकच मंगलमय झाला.

ग्रामस्थांना अनेक वर्षे भेडसावत असलेली पाण्याची समस्या आता दूर होणार असल्याची खात्री वाटू लागली आहे. विकासकामे केवळ आश्वासनात न अडकता प्रत्यक्षात उतरावी, यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असते – आमदार शेखर निकम यांनी ती सिद्ध केल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button