आरपीआय युवकचे कोकण प्रदेश उपाध्यक्ष उमेश कदम यांना पितृशोक!

गणपतीपुळे दि. ३ (वैभव पवार) :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट )युवक संघटनेचे कोकण प्रदेश उपाध्यक्ष आणि रत्नागिरी येथील भीम युवा पॅंथरचे कार्याध्यक्ष तथा धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नामवंत कार्यकर्ते उमेश कदम आणि बावीस खेडी बौद्धजन संघ दीक्षाभूमी वाटद खंडाळा संघटनेचे माजी उपाध्यक्ष, वरची निवेंडी भीम नगर शाखेचे माजी अध्यक्ष आणि वरची निवेंडीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिनेश कदम यांचे वडील सुधाकर रामचंद्र कदम यांचे यांचे २७ जून रोजी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. ते 75 वर्षांचे होते.
सुधाकर कदम हे अतिशय शांत, प्रेमळ व मनमिळाऊ असे व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या आयुष्यात प्रचंड काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा संसाररूपी डोलारा सांभाळला. त्यातूनच त्यांनी आपल्या दोन्ही मुलांवर संस्काराचे बीज रूजवून त्यांना सन्मार्गावर लावण्याचे काम केले. त्यांनी आपल्या आयुष्यात सामाजिक योगदान देताना वरची निवेंडी भीम नगर येथील भावकीचे चिटणीस म्हणून एकेकाळी काम केले. तसेच आपल्या वाडीवस्तीमध्ये त्याकाळी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेवर त्यांनी पाणी सोडण्याचे काम अतिशय प्रामाणिकपणे केले. ते वरची निवेंडी येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 18 चे ज्येष्ठ सभासद होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच वरची निवेंडी येथील स्थानिक व मुंबई भावकीच्या वतीने आणि विविध संस्था, संघटनांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे .त्यांचा जलदान विधी तथा पुण्यानुमोदन व शोकसभा कार्यक्रम त्यांच्या राहत्या घरी रविवार दिनांक पाच जुलै रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे .यावेळी विविध ठिकाणच्या बंधु भगिनींनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन त्यांचे कुटुंबीय आणि निवेंडी भावकीच्या वतीने करण्यात आले आहे.



