शिष्यवृत्ती परीक्षेत दामले विद्यालयाच्या डंका; गुणवत्ता यादीत तब्बल २१ विद्यार्थी
स्पृहा जोशी जिल्ह्यात प्रथम, तर राज्यात १५वी

रत्नागिरी दि. ३ : शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयाने यावर्षीही आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इ. ५ वी व इ . ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये तब्बल २१ विद्यार्थी शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत चमकवले आहेत. विशेष म्हणजे स्पृहा चंद्रशेखर जोशी इयत्ता ५वी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीमध्ये जिल्ह्यात प्रथम तर राज्यात १५वी आली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे दामले विद्यालयातर्फे रथातून मिरवणूक काढत अभिनंदन करण्यात आले.
शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी याप्रमाणे : (पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इ . ५वी) स्पृहा चंद्रशेखर जोशी जिल्ह्यात प्रथम, राज्यात १५वी ( २७२ ), हर्षवर्धन सचिन पाटील जिल्ह्यात १२वा ( २५२ ), आयुष अनिरुद्ध जोशी जिल्ह्यात २१ वा ( २३८ ), उमेर वसीम सय्यद जिल्ह्यात ३५वा ( २२८ ), दाक्षी उमेश शिंदे जिल्ह्यात ३६ वी ( २२६ ), ईश्वरी रमाकांत डिंगणे जिल्ह्यात ६१ वी ( २१६ ), साधना संजय लिंगायत जिल्ह्यात ६२वी, ( २१६ ), स्वाती गंभिरानंद मदने जिल्ह्यात ६५वी, २१४, आराध्या दिपक रानडे जिल्ह्यात ९८वी ( २०६ ), स्मित संदीप मांडवकर जिल्ह्यात ११४वा ( ११४ ), प्रिती राजेश जाधव जिल्ह्यात ११७ वी ( २०२ ).
इयत्ता पाचवीच्या वर्गाला सौ. श्रद्धा गांगण, श्री. योगेश कदम, श्री. मुकेश पाटील, श्री. इरफान शेख या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ताधारक : ओम हरिश्चंद्र वरेकर जिल्ह्यात ९वा ( २५२ ), श्रेया सचिन खंदारे जिल्ह्यात २९ वी ( २३० ), सई मनोज जोशी जिल्ह्यात ३५र्व ( २२६ ), सावनी आल्हाद आठलेकर जिल्ह्यात ४२ वी (२२२ ), आराध्य देवेंद्र डेंगळे जिल्ह्यात ४३वा ( २२२ ) ईशा विशाल चव्हाण जिल्ह्यात ७५वी ( २०६ ), राज रमेश कोकरे जिल्ह्यात ८४ वा ( २०२ ), सिद्धी संदीप स्वामी जिल्ह्यात ९२वी ( १९६ ), आसावरी सौरभ अवताडे जिल्ह्यात ९३ वी ( १९६ ), स्वराज संजय लिंगायत जिल्ह्यात ९४ वा ( १९६ ) या विद्यार्थ्यांना सौ. मंजिरी लिमये, सौ . सिद्धी विचारे, श्री. रवींद्र शिंदे, श्री. अक्षय जोगळेकर, श्रीम. ज्योती डंबाळे यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे नगराध्यक्ष सौ . शिल्पाताई सुर्वे, प्रशासन अधिकारी प्रा . श्री . सुधाकर मुरकुटे व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिलिंद संसारे, मुख्याध्यापक श्री . भगवान मोटे यांनी विशेष अभिनंदन केले आहे .



