रत्नागिरी

ओझरे बु.-खडीकोळवण कळदरा पंचक्रोशीतील रस्ता वाहतुकीसाठी योग्य नसल्याने एसटी फेऱ्या बंद

भर पावसाळ्यात विद्यार्थ्यांची गैरसोय; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

देवरुख दि. १ (सुरेश सप्रे) :- ओझरे बु.-खडीकोळवण कळदरा पंचक्रोशीतील रस्ता वाहतुकीसाठी योग्य नसल्याने एसटी फेऱ्या बंद झाल्याने विद्यार्थ्यांना भर पावसाळ्यात प्रवास खडतर करावा लागतो आहे. पंचक्रोशीतील पालकांसह ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. रस्त्याची समस्या त्वरित सोडवून रस्ता वाहतुक सुरू करावी अन्यथा जन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे

तालुक्यातील निनावे, ओझरे बु, व खडीकोळवण येथील ग्रामस्थांचे जनजीवन रस्त्याच्या अवस्थेमुळे खडतर झाले आहे. पावसाला नुकतीच सुरुवात झाली. आणि पहिल्या पावसात गाड्या ओझरे, खडीकोळवण येथे रस्त्याचे काम अर्धवट असल्याने येत नाहीत. त्यामुळे शेतकरी व विद्यार्थी यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे

गत चार महीने या रस्त्याचे काम चालू असून ते अर्धवट असलेने रस्त्यावर आलेलेली खडी- माती यामुळे गाडी चालवणे अवघड झाले आहे. समोरासमोर वाहने आली तर वाहने पास होताना मुश्किल होते.सदर रस्त्यावरून एसटी बस गाड्यांच्या फेऱ्या बंद केलेने विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होत आहे.

पंचक्रोशीतील सरपंच व ग्राप सदस्य यांनी अनेकवेळा तक्रारी केल्या परंतु नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दुर्लक्ष केलेने ऐन पावसाळ्यात पंचक्रोशीतील विद्यार्थ्यां व शेतकरी यांचे हाल होत आहेत.

पंचक्रोशीतील काही शाळा पटसंख्येच्या कारणाने बंद पडल्याने विद्यार्थ्यांना साखरपा येथे शिक्षणासाठी जावे लागते आहे. शाळा. कॉलेज सुरु झाली तरी बस गाड्या बंद झाल्या असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. तर शेतकरीवर्गाची शेतीअवजारे व अन्य साहित्य आणताना तारेची कसरत करावी लागत आहे त्यामुळे ओझरे बु- खडी कोळवण पंचक्रोशीतील जनतेचा भर पावसाळ्यात प्रवास खडतर बनला आहे. पर्यायी रस्त्याची व्यवस्था न केल्यास पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जन आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button