रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील सदस्यांची संख्या २१ वरुन २५

सहकार खात्याचा निर्णय 

रत्नागिरी दि. ३० :- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील सदस्यांची संख्या २१ वरुन २५ करण्याचा सहकार खात्याने घेतला आहे.

या संदर्भात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने संचालक मंडळाची संख्या २१ वरुन २५ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

विषयांकित प्रकरणी संदर्भाधीन पत्रान्वये प्रस्तावित केल्यानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम ७३ अअअ मधील तरततूदीनुसार शासनास प्राप्त असलेल्या अधिकारान्वये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील संचालक मंडळ सदस्य संख्या २१ वरुन २५ पर्यंत वाढविण्यास शासनाची मान्यता देण्यात येत असल्याचे सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button