महाराष्ट्र

सावंतवाडीत संशयास्पद फिरणाऱ्या त्या तीन जणांची पोलिस चौकशी; जम्मू- कश्मिरला पाठवले परत 

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर पोलिस यंत्रणा सतर्क; केली प्रत्येकाची ओळख परेड

सावंतवाडी दि. २५ : शहरातील भटवाडी काजरकोंड परिसरात मुस्लिम वेशातील मदतीसाठी पैशांची मागणी करणाऱ्या तीन संशयित नागरिकांना सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. हिंदुत्ववादी संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला असून, पोलिसांनी त्यांची प्राथमिक चौकशी केले असता ते जम्मू- कश्मिर येथील कुपवाडा जिल्ह्यातील मणीगा शेखपुरा येथील असल्याचे उघड झाले.दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर पोलिसायंत्रणा सतर्क झाली आणि संशयितांची केली ओळख परेड करून त्यांच्या आधारकार्ड वरील पत्ता असलेल्या कुपवाडा जिल्ह्यातील मणीगा येथे पाठवण्याची कार्यवाही पोलिसांनी केली आहे.

भटवाडी काजरकोंड परिसरातील एका घरात मुस्लिम वेश परिधान केलेल्या दोन पुरुष आणि एक युवती अशा तीन व्यक्तींनी प्रवेश केला आणि मदतीसाठी पैशांची मागणी सुरू केली. मात्र, त्यांच्या वागण्याबोलण्याचा संशय आल्याने ज्यांच्या कडे पैसे मागत होते त्यांनी तातडीने स्थानिक हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, हे तिघेही स्थानिक नसल्याचे आणि त्यांची हिंदी भाषाही वेगळी असल्याचे निदर्शनास आले. वाढत्या संशयामुळे कार्यकर्त्यांनी तात्काळ सावंतवाडी पोलिसांना पाचारण केले.

पोलीस चौकशीत ते लोक जम्मू-कश्मीरचेचे

माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तिघांनाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. प्राथमिक चौकशीत हे नागरिक जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील मणीगा गावचे असल्याचे निष्पन्न झाले. सावंतवाडी पोलिसांनी अधिकृत पडताळणीसाठी थेट जम्मू-काश्मीरमधील संबंधित पोलीस ठाणे, तेथील बीट अंमलदार आणि सरपंचांशी फोनवरून संपर्क साधून माहिती घेतली. त्यांच्याकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतर, हे नागरिक फिरस्ते असल्याची नोंद करून त्यांना परत पाठवले आहे. नागरिकांनी अशा संशयित लोकांपासून सावध राहावे, त्यांना घरात घेऊ नये आणि काहीही संशय आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सावंतवाडी पोलिसांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button