रत्नागिरी

जैतापूरचे ज्येष्ठ कापड व्यापारी हाजी सलीम बावानी यांचे निधन

जैतापूर दि. ६ सप्टेंबर : जैतापूर येथील जुने जाणते कापड व्यापारी तथा अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले हाजी सलीम बावानी (वय ७०) यांचे मंगळवार, दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांच्या जैतापूर येथील राहत्या घरी आकस्मिक निधन झाले.

जैतापूर येथे गेली अनेक वर्षे कापड व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. मनमिळाऊ स्वभाव, सर्वांशी आपुलकीने वागणे आणि नेहमी हसतमुख राहणे यामुळे ते परिसरात सर्वपरिचित होते. त्यांच्या प्रेमळ व अजातशत्रू स्वभावामुळे समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

त्यांच्यावर जैतापूर येथील कबरस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, सुना, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

सुमारे सात ते आठ वर्षांपूर्वी त्यांनी मुस्लिम समाजातील पवित्र मानली जाणारी हज यात्रा देखील पूर्ण केली होती. त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी समजताच संपूर्ण बावानी परिवारासह जैतापूर परिसरात शोककळा पसरली असून, त्यांच्या निधनाने एक मनमिळाऊ व सर्वांना आपलंसं करणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button