रत्नागिरी

अखेर शासनाकडून रायपाटण येथे अप्पर तहसीलदार कार्यालयास मान्यता

रत्नागिरी दि. २४  :- राजापूर तालुक्याचा प्रचंड विस्तार पाहून अखेर आज शासनाने रायपाटण येथे अप्पर तहसीलदार कार्यालय निर्माण करण्यासाठी मान्यता दिली आहे. मान्यतेबाबत सूचना व हरकती सादर करण्यासाठी शासन स्तरावरिल आदेशानुसार पुढील विहित कार्यवाही साठी मुदत देण्यात आल्याने परिसरात हे आदेश प्राप्त झाल्यानंतर समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ज्याअर्थी, शासन, महसूल व वनविभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक पदनि 2019/प्र.क्र.68 (भाग-2)/आस्था-8, दि. 02 एप्रिल 2026 अन्वये कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मौजे रायपाटण ता. राजापूर येथे अपर तहसीलदार कार्यालय निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे व शासन, महसूल व वनविभाग यांचेकडील पत्र क्रमांक : प्राफेब-2026/प्र.क्र.80/पुनर्रचना दि. 23 जून 2026 अन्वये अपर तहसीलदार कार्यालय निर्माण करण्याबाबतची “जाहीर सूचना” प्रसिद्ध करून हरकती व सूचना शासनाकडे सादर करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.

त्याअर्थी, वरील बाबी विचारात घेऊन, उक्त शासन निर्णय व पत्रान्वये शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे उपविभागीय अधिकारी, राजापूर यांना रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात मौजे रायपाटण येथे अपर तहसीलदार कार्यालय निर्मितीची सूचना काढण्याचे योजिले आहे. त्या सूचनेचा मसुदा उक्त शासन निर्णय व पत्र अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे तिचा परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याव्दारे प्रसिद्ध करण्यात येत आहे.असे प्रशासन पातळीवरून निर्देशीत करण्यात आले आहे.

या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पाचल, सौंदळ आणि तळवडे ही मंडळे राहणार आहेत. प्रस्तावित अपर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये समाविष्ट होणाऱ्या मंडळांव्यतिरिक्त उर्वरित मंडळे पूर्वीच्याच तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट राहतील.

उक्त मसुद्यासंबंधी कोणत्याही व्यक्तींकडून ज्या कोणत्या हरकती किंवा सूचना असतील त्या “जाहीर सूचना” प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून पुढील पंधरा दिवसांत (कार्यालयीन सुट्ट्या धरून) उपविभागीय अधिकारी राजापूर व तहसीलदार राजापूर यांचेकडे देण्यात याव्यात व त्या विचारात घेण्यात येतील. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत.

असे प्रशासकीय पातळीवरून अधिकृतपणे सूचित करण्यात आल्याने अंत्यत समाधान व्यक्त केले जात आहे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button