रत्नागिरीसामाजिक

दापोलीतील ए. जी . हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप

दापोली दि. २० :- आय के एस हेल्थ, सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई व श्रीराम बलवर्धक मंडळ, जालगांव यांच्या संयुक्त विद्यमाने ए. जी . हायस्कूल, दापोली येथे इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या या स्तुत्य उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, कंपास पेटी , वह्या तसेच इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहवर्धक सुरुवात करण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमास प्रमुख मान्यवर श्रीराम बलवर्धक मंडळ, जालगावचे अध्यक्ष श्री. प्रकाश यशवंत रेळेकर सर तसेच उप मुख्याध्यापक श्री. अर्जुन घुले सर, श्री महाजन सर,श्री आठल्ये सर, कु. म्हस्के मॅडम ,श्री पाडळकर सर, श्री. मिसाळ सर, श्री . दाभोळे सर, श्री कोकणे, कर्मचारी श्री घाग सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना परिश्रमपूर्वक शिक्षण घेऊन उज्ज्वल भवितव्य घडविण्याचा संदेश दिला. समाजातील दातृत्वशील संस्था विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देत असल्याचे सांगून आयोजक संस्थांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शैलेश आठल्ये सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. घुले सर यांनी केले .

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. शाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मोलाची मदत मिळाली असून उपस्थितांनी आयोजक संस्थांच्या सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button