माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रचना राजेंद्र महाडिक यांचा वचनपूर्ती सोहळा

संगमेश्वर दि. १३ ( प्रतिनिधी ):- काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक पार पडली, निवडणुकीला जिल्हा परिषद सदस्य पदासाठी सौ रचना राजेंद्र महाडिक उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असताना त्यांनी प्रचारादरम्यान जाखमाता गुरववाडी येथील गावकऱ्यांना त्यांच्या मागणी नुसार रस्ता करून द्यायचे वचन दिले होते. परंतु निवडणुकीचा निकाल काहीही असला तरी सुद्धा सौ रचना राजेंद्र महाडिक ताई यांनी आपले वचन पूर्ण केले व मजबुत रस्ता करून देत वचनपूर्ती केली आहे.
सदर रस्त्याचे काम पूर्ण करून दिल्याबद्दल तेथील ग्रामस्थानी रचनाताई महाडिक व त्यांचे राजेंद्र विष्णू महाडिक यांना बोलावून त्यांचा यथोचित सन्मान करून वचन पूर्ती सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी मधुकर गुरव, रमाकांत गुरव, वैभव पोमेंडकर, बबन निंगावळे, रवींद्र कदम, सदानंद गुरव, सचिन जंगम, महेश घोरपडे, सुरेश गुरव, अश्विनी गुरव, दर्शना गुरव, हनीफ वलेले, बंड्या नागवेकर तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते उपस्थित होते.



