ऑनलाईन बँकींग फसवणूक करणाऱ्या दोन जणांना दहिसर येथे पोलिसांनी घेतले ताब्यात

रत्नागिरी दि. १८ :- ऑनलाईन बँकींग फसवणूक करणाऱ्या दोन जणांना दहिसर येथून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने ताब्यात घेतले आहे.
दिनांक 17/02/2026 रोजी 14.30 ते दिनांक 09/03/2026 रोजी सकाळी 10.00 वाजण्याच्या मुदतीत जयगड पोलीस ठाणे हद्दी मधील साखरी बौध्दवाडी, येथून ऑनलाईन बँकींग फसवणुकीबाबत दिनांक 21/03/2026 टोजी जयगड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 15/2026 भारतीय न्याय संहिता-2023 चे कलम 318 (4), 319(2), 336(2), 336(3), 340(2), 204, 3 (5) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (सी), 66 (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या सूचनेनुसार अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी व उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग श्री. निलेश माईनकर यांनी या दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने ऑनलाईन बँकीग फसवणूक करणाऱ्या आरोपींचा शोध घेणेबाबत व गुन्ह्याचा अधिक तपास करण्याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र यादव यांना मार्गदर्शन करून पुढील तपास सोपविण्यात आला होता.
त्याप्रमाणे गुन्ह्यातिल आरोपींबाबत गोपनीय व तांत्रिक माहिती प्राप्त करण्याचे करण्याचे काम सुरु होते. त्याप्रमाणे दिनांक 14/04/2026 रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्री. अभय तेली व पोलीस अंमलदार पो.हवा / 1446 संदेश मोंडे, जयगड सागरी पोलीस ठाणे यांनी दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने गोपनिय माहिती, तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दहिसर येथुन संशयीत इमस 1) दुर्गेश चम्मण रॉय वय 48 वर्षे रा. पंढरी गंगाराम राजभार, आर. बी. यादव चाळ, शिव वल्लभ, क्रॉस रोड, एन.जी.पार्क, रावल पाडा, दहिसर (पूर्व), मुंबई-400068, 2) अर्जुन रामसुंदर चौहान वय 38 वर्षे रा. रूम नं. 11, अख्तर हसैन चाळ, एस.एन. दुबे रोड, एन.जी. पार्कजवळ, अजिंक्यनगर, कोकणीपाडा, दहिसर (पूर्व), मुंबई – 400068 यांना ताब्यात घेण्यात आले व चौकशीदरम्यान आरोपींनी फिर्यादीच्या बँक खात्यातून रक्कम ₹4,82,000/- काढल्याचे कबुल केल्याने त्यांना दिनांक 17/04/2026 रोजी 23.55 वा. अटक करण्यात आलेली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग श्री. निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र यादव व पोलीस उप निरीक्षक श्री. अभय तेली, रत्नागिरी ग्रामिण पोलीस ठाणे, पो.हवा/1446 संदेश शिवराम मोंडे, जयगड सागरी पोलीस ठाणे, म.पो.हवा/1334 दूर्वा शेटे, सायबर पोलीस ठाणे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.



