रत्नागिरी

लाजुळ नरमे येथील जिल्हास्तरीय जलसा गीत गायन स्पर्धेत “निळी पाखरं कलामंच संगमेश्वरने प्रथम क्रमांक मिळवून रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली

विल्ये दि. १८ :- भीमशक्ती जलसा कला निकेतन लाजूळ रत्नागिरीच्या माध्यमातून जलसा निर्मितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन वर्ष शुभारंभ निमित्त आयोजित “गीत बहार सप्तसुरांचा पर्व-१” जिल्हास्तरीय भव्य जलसा गीत गायन स्पर्धा रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी सायं- ७:३० वा.आनंदनगर लाजुळ नरमे रत्नागिरी येथे उत्साही वातावरणात पार पडल्या.

या स्पर्धेत एकूण १२ जलसा मंडळानी सहभाग घेतला होता.सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक निळी पाखरं कला मंच ता.संगमेश्वर रत्नागिरी संघास -७१०१/रुपये रोख,आकर्षक सन्मानचिन्ह व गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच माता रमाई जनसेवा संगीत जलसा मंडळ तेर्ये, संगमेश्वर ने द्वितीय क्रमांक पटकावला त्यांना ५१०१/रुपये रोख,आकर्षक सन्मानचिन्ह व गौरव पत्र तसेच तृतीय क्रमांक पंचशील जलसा मंडळ चाफेरी ता.जि.रत्नागिरी या संघाने मिळवला. त्यांना ३१०१ /- रुपये रोख, आकर्षक सन्मानचिन्ह व गौरव पत्र देवून सन्मान करण्यात आला. तसेच उत्तेजनार्थ प्रथम आम्रपाली कलामंच मालगुंड संघास रोख – १०००/रुपये,आकर्षक सन्मान चिन्ह व गौरव पत्र,द्वितीय उत्तेजनार्थ – नवक्रांती जलसा मंडळ दोडवली ता.गुहागर,जि रत्नागिरी या जलसा मंडळास १०००/रुपये,आकर्षक सन्मान चिन्ह व गौरव पत्र.तसेच उत्कृष्ट सांघिक गायकी हे पदक निळी पाखरं जलसा मंडळ संगमेश्वरने जिंकले तर उत्कृष्ट ढोलकी वादक म्हणून माता रमाई जलसा मंडळ तेर्ये आणि उत्कृष्ट हार्मोनियम वादक निळी पाखरं कलामंच ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी यांना प्रत्येकी ५००/- रुपये रोख बक्षीस आणि गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या स्पर्धेतील परीक्षक संतोष कासारे, सुधाकर सावंत (पाली ) यांनी अतिशय उत्तम परीक्षण करून सहभागी जलसा मंडळाना स्पर्धेकरिता तय्यारी करताना महत्वाची काळजी घेण्यासाठी प्रभावी मार्गदर्शनही केले.

सदर स्पर्धा कार्यक्रम आयोजक मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक विजय रामचंद्र सावंत (गुरुवर्य), गौतम सावंत (कवी /लेखक), कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि सूत्रधार कवी/गायक सुधाकर शंकर सावंत, तसेच विशेष सहकार्य रविकांत पवार सर (मालगुंड ),सतीश कदम सर, आयु. प्रदीप सावंत अध्यक्ष मिलिंद प्रतिष्ठान, गौतम सावंत, दिलीप सावंत, चित्रक सावंत, अरुण सावंत, संगीता सावंत, शुभांगी सावंत, अर्चना सावंत,

सुदास सावंत सरचिटणीस मिलिंद प्रतिष्ठान रत्नागिरी आणि प्रमुख मार्गदर्शक मान्यवर प्रविण पांचाळ, सभापती पं.स., जिल्हापरीषद रत्नागिरी ऋतूजा राजेश जाधव, माजी सभापती समाजकल्याण विभाग

रत्नागिरी प्रितम दिपक सावंत, अध्यक्ष बौ.से.कमिटी लाजूळ,सौ.निशा आदेश सावंत (अध्यक्ष आदर्श महिला मंडळ बौ.से.कमिटी लाजूळ ), सामाजिक कार्यकर्ते मा.प्रकाश पवार , पत्रकार संतोष पवार, वैभव पवार, आणि अमित कांबळे, समाज भूषण संजय धावारे या कार्यक्रमास उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे अप्रतिम सूत्रसंचालन सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक, उत्कृष्ट निवेदक सुशिल जाधव यांनी स्पर्धेतील जलसा मंडळे आणि उपस्थित रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध जलसाकार मंडळींकडून तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून आयोजकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button