रत्नागिरी

पुणे येथील डिजिटल टेक्नॉलॉजी एक्स्पर्ट संजय साळुंखे यांच्या तीन दिवसीय कार्यशाळेचे रत्नागिरीत आयोजन

रत्नागिरी दि. १७ :-  उज्वल शिक्षण मंडळ, रत्नागिरी संचलित आगम द कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट येथे पुणे येथील डिजिटल टेक्नॉलॉजी एक्स्पर्ट संजय साळुंखे यांच्या तीन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन आज सकाळी 10 वाजता संपन्न झाले. ही कार्यशाळा दि. 17, 18 व 19 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी माझ्या शुभहस्ते संजय साळुंखे यांना शाल व पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले. तर संचालक उदय शिंदे यांच्या हस्ते संजय साळुंखे यांचे फोटो फ्रेम व रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.

संजय साळुंखे हे एम.एस्सी. (इलेक्ट्रॉनिक्स) पदवीधर असून डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, ग्राफिक डिझाइनिंग, नेटवर्किंग, प्री-प्रेस टेक्निक्स, वेब डिझाइनिंग व मल्टिमीडिया अॅनिमेशन या विषयांतील तज्ज्ञ आहेत. तसेच ते सर्टिफाइड वेब मास्टर असून अमेरिकेतील नोव्हेल कॉर्पोरेशनकडून वेब अॅडमिनिस्ट्रेशन, नेटवर्क टेक्नॉलॉजी, डिझाईन अँड इम्प्लिमेंटेशन, इन्स्टॉलेशन व सर्व्हिस सपोर्ट या विषयांमध्ये त्यांनी प्राविण्य मिळवले आहे.

या कार्यशाळेस शासकीय आयटीआयमधील डीटीपी विभागाचे विद्यार्थी तसेच इयत्ता 10 वी व 12 वीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

कार्यक्रमाचे नियोजन संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक प्रा. संदेश पालये यांनी केले. यावेळी प्रतीक्षा पांचाळ, अनिश दाते यांच्यासह मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button