देव-घैसास-कीर महाविद्यालयामध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

रत्नागिरी दि. १४ :- भारत शिक्षण मंडळाचे, देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरीष्ठ महाविद्यालयात इतिहास विभाग व आय क्यू ए सी आज दि. १४ एप्रिल २०२६ रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. महाविद्यालयाच्या प्राचार्या पाटील मॅडम यांच्या हस्ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख रिया बंडबे यांनी केले.
या कार्यक्रमात एन.एन.एस.विभाग प्रमुख वाडेकर मॅडम यांनी आंबेडकर यांचा जीवन परिचय सांगितला. तसेच अर्थशास्त्र विभाग प्रमुख कीर मॅडम यांनी आंबेडकर यांच्या आयुष्यातील त्यांना भावलेला वाचनाचा प्रसंग भाषणाद्वारे उलगडला.
तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा व महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, कला शाखा प्रमुख भोवड मॅडम, वाणिज्य शाखा प्रमुख साळगावकर मॅडम, विज्ञान शाखा प्रमुख घाणेकर सर, इतिहास विभाग प्रमुख रिया बंडबे, इतर प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार तेजस जाधव याने मानले.



