२२ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा: कोल्हापूर केंद्रातून ‘ठोंब्या’ प्रथम
दामले विद्यालय, रत्नागिरी नगर परिषद शाळ क्र. १५ या संस्थेच्या काय ते जूनं या नाटकासाठी तृतीय पारितोषिक

मुंबई, दि. ३ :- २२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून अभिरुची, कोल्हापूर या संस्थेच्या ठोंब्या या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच अलंकार कला अकादमी फाऊंडेशन, कोल्हापूर या संस्थेच्या चेटकीणीच्या बंगल्यात या नाटकास द्वितीय पारितोषिक, दामले विद्यालय, रत्नागिरी नगर परिषद शाळ क्र. १५ या संस्थेच्या काय ते जूनं या नाटकासाठी तृतीय पारितोषिक, सिटी हायस्कूल, सांगली या संस्थेच्या जंगल स्कूल या नाटकासाठी चतुर्थ पारितोषिक तसेच श्री कांतीलाल पुरुषोत्तम दास शाह प्रशाला इंग्लिश मिडीयम सेकंडरी युनिट, सांगली संस्थेच्या द कॅसलिंग या नाटकासाठी पाचवे पारितोषिक प्राप्त जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या पाचही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे कोल्हापूर केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-
दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक जितेंद्र देशपांडे (नाटक- ठोंब्या), द्वितीय पारितोषिक शाहबाज गोलंदाज (नाटक- काय ते जूनं), तृतीय पारितोषिक शिरीष विचारे (नाटक-चेटकिणीच्या बंगल्यात), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (नाटक- वारी), द्वितीय पारितोषिक अभिषेक कोयंडे (नाटक- लगोरी), तृतीय पारितोषिक धीरज पलसे (नाटक- द कॅसलिंग), नेपथ्य प्रथम पारितोषिक सागर सगरे (नाटक-जंगल स्कूल) द्वितीय पारितोषिक निरंजन सागवेकर (नाटक-काय ते जूनं), तृतीय पारितोषिक अरुण पाटील (नाटक-बीज अंकुरले), रंगभूषा : प्रथम पारितोषिक सुशांत सावंत (नाटक- मैत्र जिवांचे), द्वितीय पारितोषिक सागर सगरे (नाटक- जंगल स्कूल), तृतीय पारितोषिक दिपा कोळी (नाटक- भुताचा बाप), वेशभूषा प्रथम पारितोषिक निलिमा ग्रामोपाध्ये (नाटक-राजकन्येची बाहुली), द्वितीय पारितोषिक वेदा सोनुले (नाटक-चेटकीणीच्या बंगल्यात), तृतीय पारितोषिक रमेश यळगूडकर (नाटक- आमची काय चूक ?), संगीत दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक आर्या पोटे (नाटक-व्हॉट्सअपचा तमाशा), द्वितीय पारितोषिक हर्ष नागवेकर (नाटक-धोंड), तृतीय पारितोषिक आप्पा गावडे (नाटक-वारी), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक आरव गुळवणी (नाटक- ठोंब्या) व विदुला मुळ्ये (नाटक-धोंड), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे आरोही गुळवणी (नाटक-चेटकीणीच्या बंगल्यात), स्वरा मेंडगुले (नाटक-झिम्माड झिम), विभा शिंदे (नाटक- बीज अंकुरले), सावी मुद्राळे (नाटक-लगोरी), इंद्रजा पटवर्धन (नाटक-द कैंसलिंग), अजिंक्य पोटे (नाटक-व्हॉट्सअपचा तमाशा), हितेश राजबंसी (नाटक-सर तुम्ही गुरुजी व्हा), अर्णव सरपोतदार (नाटक-काय ते जूनं), दर्शन कांबळे (नाटक-तीन पाहुणे) रियांश चव्हाण (नाटक- उंदिर मामाची जादूची दुनिया)
दि. ०५ जानेवारी ते १४ जानेवारी, २०२६ या कालावधीत गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण ४९ बालनाट्य प्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. गिरीश भुतकर, श्री. हनुमान सुरवसे आणि श्रीमती वैदेही चवरे यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या नाटकांच्या संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले.
बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या सर्व संस्था आणि बालकलाकार यांनी मेहनत घेऊन सादर केलेल्या सर्व दर्जेदार बालनाटकांना प्रेक्षकांनी चांगली दाद दिली. भविष्यातही संस्था व बालकलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केलेली आहे.



