क्रीडारत्नागिरी

जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेसाठी संगमेश्वरच्या खेळाडूंची निवड

देवरूख दि. ३ :- रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन मान्यतेने व संघ रत्नागिरी,यांच्या सहकार्याने आयोजित 19 वि क्युरोगी व 13 वि पूमसे रत्नागिरी जिल्हा खुली चॅलेंज तायक्वांडो स्पर्धा सन 2026-27 छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम बॅडमिंटन हॉल रत्नागिरी या ठिकाणी दिनांक 06 ते 08 फेब्रुवारी दरम्यान मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून या स्पर्धेसाठी संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर, चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड, गुहागर, तालुक्यांमधून सुमारे 600 खेळाडू सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेसाठी संगमेश्वर तालुक्याच्या खेळाडूंची निवड करण्यात आली. यावेळी नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब अध्यक्षा सौ. स्मिता लाड, प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, क्लब उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर, सुमीत पवार, साईप्रसाद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

या स्पर्धेसाठी संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमीच्या अंतर्गत नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब, लायन्स तायक्वांडो क्लब, या क्लबचे खेळाडू संगमेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार असून ओपन तायक्वांडो चॅम्पियनशिप स्पर्धेला खेळणाऱ्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे – जीवित देशपांडे, सई संसारे, शुभ्रा माळी, अनुराग यादव, निकुंज घडशी, स्वानंदी कांगणे, शौर्य माळी, सोमांश सावंत, पूर्वा वनकर, नक्षत्रा शिंदे, वेदांत मसुरकर, मल्हार साने, ईशान भागवत, ऋत्विक कांगने,अफजान फुलारी, गंधार रेवडेकर, प्रभात रहाटे, पुर्वा रहाटे, मिहिका लाड, शौनक राजवाडे, रीतीशा कांगणे, ईश्वरी कांगणे,आदित्य चिपळूणकर,साहिल जागुष्टे, शुभ्रा सुर्वे, मंथन चव्हाण, अजिंक्य शिंदे, सोहम चव्हाण, गंधर्व शेट्ये, शरणी कोळवणकर, अवनी भिंगार्डे, वेद पटेल, प्रणित कांबळे, सुमीत पवार आदीची निवड करण्यात आली

निवड झालेल्या खेळाडूंना तालुका अकॅडमीचे अध्यक्ष माजी आम.सुभाष बने, देवरुख नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष वैभव पवार, मुख्याधिकारी प्रशांत भोसले, क्लब उपाध्यक्षा ॲड. सौ.पुनम चव्हाण,  लायन्स तायक्वांडो क्लबचे अध्यक्ष दिलीप रहाटे, चिन्मय साने, सिनियर खेळाडूंनीसह सर्व नगरसेवक आदींनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button