रत्नागिरी

दादासाहेब सरफरे विद्यालयात तालुकास्तरीय निसर्ग चित्र स्पर्धेला बालकलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बालकलाकारांच्या कलाकृती पाहून उपस्थित झाले थक्क

संगमेश्वर दि. २१ ( प्रतिनिधी ):- विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळण्यासाठी संस्थेने तालुकास्तरीय चित्रकला स्पार्धा सारखा उपक्रम राबवला आहे. आपण खुप नशीबवान आहोत कोकणासारख्या स्वर्ग भुमीत जन्मलो आहोत. इथला वारसा पाहीला तर निसर्ग आणि त्यास पुरक अशी ग्रामीण जीवन पद्धती यामुळे कोकण सर्वांसाठीच आकर्षित ठरला आहे. हा विषय डोळ्यासमोर ठेवून दादासाहेब सरफरे विद्यालयामध्ये परीसरातील ग्रामीण जीवन दर्शन घडविणारी निसर्ग चित्र स्पर्धा आयोजित केली गेली आहे.” असे प्रतिपादन बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था उपाध्याक्ष प्रताप देसाई यांनी यांनी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेच्या सभागृहात संस्था सरचिटणीस शरद बाईत, स्कुल कमिटी अध्यक्ष दिनेश जाधव, संचालक प्रविण पवार, शिवने ग्रामपंचायत सरपंच मारुती पवार, मुचरी केंदाचे केंद्रप्रमुख बावदाने प्रशालेचे, प्राचार्य प्रकाश विरकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून तालुकास्तरीय निसर्ग चित्र स्पर्धा उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्पर्धांमध्ये सहभागी मार्दर्शक शिक्षक व विद्यार्थ्यांना संस्था सरचिटणीस शरद बाईत, स्कुल कमिटी अध्यक्ष दिनेश जाधव, संचालक प्रविण पवार यांनी तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचा उद्देश विशद करुन स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.

इयत्ता ४ थी ते ५ वी, इयत्ता ६ वी ते ७ वी व इयत्ता ८ वी ते १० वी अशा तीन गटात आयोजित केलेल्या या कला स्पर्धेमध्ये तालुक्यातील प्राथमिक व माध्यामिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी कोकण खाडी किनारा व जनजीवन, कोकण वारसा जपणारी चौसोपी मंगलोरी कौलारु घरे व त्या भोवतालचा परीसर, कोकण निसर्ग अशी विविध चित्रे विद्यार्थी काढण्यात गुंग होते. कल्पकता आणि रंगसंगती यामुळे बालवयीन व किशोरवयीन विद्यार्थी आपल्या कल्पनेप्रमाणे काढत असलेले चित्र मान्यवरांसाठी कुतुहुलाचे विषय बनले, प्राथमिक व उच्च प्राथमिक गटात अरुंधती पाध्ये इंग्लिश मेडीअम स्कुल देवरुख तर माध्यमिक गटामध्ये दादासाहेब सरफरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढलेली निसर्ग चित्रे मान्यवर व परीक्षकांच्या कौतुकास पात्र ठरले. दादासाहेब सरफरे विद्यालयाचा विद्यार्थी ओंकार सखाराम रामाणे यांनी काढलेले निसर्ग चित्र सर्वानाच आवडले.

या तालुकास्तरीय निसर्ग चित्रकला स्पर्धेत प्रथम गटात प्रथम कुमारी रुही राहुल गांधी (अरुंधती पाध्ये इंग्लिश मेडीअम स्कुल देवरुख ), द्वीतीय ईश्वरी संदीप घडशी (दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी – शिवने), तर तृतीय शिवम योगेश दोरकडे (जि.प. प्राथ.शाळा लोवले पड्ये.) तर उत्तेजनार्थ सावली जितेंद्र बाईत (दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी शिवने) व अर्पिता राजाराम वाचम (जि.प. प्राथ. शाळा कोसुंब रेवाळे) तर द्वीतीय गटामध्ये प्रथम- ईश्वरी मंगेश कांगणे (अरुंधती पाध्ये इंग्लिश मेडीअम स्कुल देवरुख), द्वितीय-ईश्वरी सुनिल सुवरे ((दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी – शिवने), तृतीय- आयुष हेमंत चव्हाण (अरुंधती पाध्ये इंग्लिश मेडीअम स्कुल देवरुख ) आणि उत्तेजनार्थ अवनीश भरत वास्कर (दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी – शिवने) व अलमिरा अमजद वलेली (इंग्लिश स्कुल कडवई) तसेच माध्यमिक गटामध्ये प्रथम-ओंकार सखाराम रामाणे ((दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी शिवने), द्वितीय – कु.दिया गणेश खामकर (अरुंधती पाध्ये इंग्लिश मेडीअम स्कुल देवरुख), तृतीय- त्रिवेष राजाराम बाचिम ((दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी- शिवने), तर उत्तेजनार्थ सार्थक सखाराम रामाणे ((दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी शिवने), व स्वर दिपक सुर्वे (पैसा फंड स्कुल संगमेश्वर) यांस मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस व सन्मानचिन्हे व गौरव प्रमाणापत्र देउन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कला शिक्षक प्रदीप शिवगण यांनी प्रयत्न केले तर परीक्षक म्हणून सुयोग पेढारकर व चित्रकार विष्णु परिट यांनी काम पाहीले. तर सुत्रसंचलन शिक्षक सुहास गेल्ये यांनी केले. यावेळी संस्था अध्यक्ष दिलीप मोरे, उपाध्यक्ष विक्रांत जाधव, खजिनदार महेश जाधव व संस्था सहकारी सर्व संचालक यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सर्वांचे आभार मानले व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button