रत्नागिरी

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघातील आचारसंहिता संपुष्टात

रत्नागिरी, दि. ५:- भारत निवडणूक आयोगाकडील 18 मे 2026 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकानुसार महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुका 2026 चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. सदर निवडणूक कार्यक्रमानुसार रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाली आहे. यास्तव भारत निवडणूक आयोगाकडील 2 जानेवारी 2024 मधील आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीच्या तरतुदीनुसार रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाल्याने सदर मतदारसंघातील आचारसंहिता संपुष्टात आलेली आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button