महाराष्ट्र

संगमेश्वरचे सुपुत्र, ठाण्यातील सुप्रसिद्ध उद्योजक तुषार सरदेशपांडे यांचे निधन

ठाणे दि. १३ :- ठाणे येथील प्रसिद्ध उद्योजक तुषार सरदेशपांडे (वय ७१) यांचे कौशल्य हाँस्पिटल पाचपाखाडी येथे उपचारादरम्यान दुखःद निधन झाले.

संगमेश्वर तालुक्यातील कनकाडीचे गावचे सुपुत्र असलेले तुषार हे ठाण्यातील मखमली तलाव भागात सिंधुतिर्थ सोसायटीतील हरहुन्नरी. मनमिळाऊ दिलदार स्वभाव व दानशूर व्यक्तीमत्व अशी ओळख असलेले तुषार हे ठाण्यातील सामाजिक कामात अग्रेसर होते. विविध सामाजिक व क्रीडा संस्थांमध्ये कार्यरत असल्याने ठाणे जिल्ह्यात त्यांचा फार मोठा मित्र परिवार होता.

त्यांना १० दिवसांपुर्वी फुफ्फुसाच्या आजाराचा त्रास होत असलेने त्याचेवर पाचपाखाडी येथील कौशल्य हाँस्पिटल येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज दुपारी दोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. अविवाहित असलेल्या तुषार यांचे पश्चात वहीनी. पुतण्या व पुतणी. जावई असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button