
रत्नागिरी दि. १५ :- जि. प. व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी पहिली उमेदवारी जाहीर केली आहे. रत्नागिरी तालुक्यातील पाली पंचायत समिती गणातून डॉ. पद्मजा कांबळें यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवणार की शिवसेना व भाजपा स्वतंत्र लढणार यावर अजून निर्णय झाला नसल्याचे समजते. त्यातच पाली गणातून पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी उमदेवार जाहीर केला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील पाली पंचायत समिती गणातून डॉ. पद्मजा कांबळें यांना पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. ही निवड करताना पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती च्या निवडणूकी साठी पन्नास टक्के तरुण आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येते.
रत्नागिरी जिल्हा परिषदेवर एकहाती शिवसेनेची सत्ता आहे.तसेच रत्नागिरी तालुका पंचायत समिती मध्ये ही 20 पैकी 19 सदस्य शिवसेनेचे असल्याने दोन्ही ठिकाणी पालकमंत्री डॉ उदय सामंत यांचेच वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुती होणार कि शिवसेना एकला चलो रे च्या भुमिकेत राहणार हे पुढील काही दिवसांतच दिसून येईल.



