रत्नागिरी

रत्नागिरी पोलीस दलातील १५ अंमलदारांना पदोन्नती प्रदान

७ अंमलदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर तर ८ अंमलदारांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती

रत्नागिरी दि. ६ :- पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे रत्नागिरी पोलीस दलातील १५ अंमलदारांना पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या शुभहस्ते पदोन्नती प्रदान करण्यात आली. यावेळी अंमलदारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यामध्ये ७ अंमलदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर तर ८ अंमलदारांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती प्राप्त अंमलदार :

स्नेहल पेढांमकर , विद्या साळवी, स्वाती राणे, अक्षया बागवे, किशोरी गंगावणे, उमेश बागवे व स्वप्नील तळेकर.

पोलीस हवालदार पदावर पदोन्नती प्राप्त अंमलदार :

दत्तात्रय कांबळे, ज्योती धामणस्कर, मनोज शिंदे, रेखा दिवे, शंकर ठोंबरे, नैना गावीत, तेजस्वी गांधी,राजेंद्र नलावडे.

या कार्यक्रमास पोलीस अधिकारी,अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button