अशोक मामांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील अमूल्य योगदानाला सलाम:- ना. उदय सामंत

कोल्हापूर दि. ५ :- मराठी सांस्कृतिक क्षेत्रातील अशोक सराफ यांचे व्यक्तिमत्व हे पक्षीय भिंतींपलीकडे जाऊन सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांनी आपल्या अद्वितीय अभिनयशैलीद्वारे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला देशाच्या पातळीवर नवा दर्जा दिला आहे. अशोक मामांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील अमूल्य योगदानाला आपला सलाम, अशा शब्दात ना. उदय सामंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
गोविंदराव टेंबे रंगमंदिर, देवल क्लब, मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे आयोजित संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत उपस्थित होते.
या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना त्यांच्या अतुलनीय अभिनय, विविधतेने समृद्ध कलाप्रवास आणि मराठी संस्कृतीस दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल ना. उदय सामंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या विशेष प्रसंगी ना. उदय सामंत यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
मराठी सांस्कृतिक क्षेत्रातील अशोक सराफ यांचे व्यक्तिमत्व हे पक्षीय भिंतींपलीकडे जाऊन सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांनी आपल्या अद्वितीय अभिनयशैलीद्वारे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला देशाच्या पातळीवर नवा दर्जा दिला आहे.
कोल्हापूर या भूमीने रुजवलेली सांस्कृतिक परंपरा आजही महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राला दिशा देते आणि त्या परंपरेचा सन्मान करण्यासाठी हा सोहळा एक ऐतिहासिक क्षण ठरला असल्याचे ना. उदय सामंत यांनी म्हटले.
या प्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ, जेष्ठ अभिनेत मनोहर जोशी, आमदार सतेज पाटील, गिरीश महाजन आदी मान्यवर कलाकार तसेच कोल्हापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



