ओणी येथे महामार्गावर मृतावस्थेत आढळला बिबट्या

राजापूर दि. ५ :- राजापूर तालुक्यातील ओणी येथील लांजा ते राजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 या रस्त्यावर बिबट हा वन्यप्राणी मृत अवस्थेत आढळून आला. दरम्यान, अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याच्या तोंडाला व डोक्याला गंभीर इजा झाल्याने मृत झाला असावा असा प्राथमिक अंदाज नोंदविण्यात आला.
या संदर्भातील माहिती सकाळी 3:४० वाजण्याच्या सुमारास श्री. अमित यादव पोलिस निरीक्षक राजापूर यांनी दूरध्वनीवरून दिली त्याप्रमाणे तात्काळ परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना सदरची माहिती देऊन सर्व स्टाफसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तर लांजा ते राजापूर जाणाऱ्या महामार्गाच्या उजव्या बाजूला वन्यप्राणी बिबट (नर) निपचित पडलेला दिसून आला. जवळ जाऊन बिबट्याची पाहणी केली असता अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याच्या तोंडाला व डोक्याला गंभीर इजा झाल्याने मृत झाला असावा असा प्राथमिक अंदाज नोंदविण्यात आला.
त्यानंतर पशुधन विकास अधिकारी राजापूर श्री. वैभव चोपडे यांच्याकडून बिबट्याचे शवविच्छेदन करून घेतले सदर बिबट्या हा नर जातीचा असून अंदाजे 3 ते 4 वर्षांचा आहे सदर घटनेचा गुन्हा नोंद केला. असून कागदपत्र तयार करून पुढील तपास चालू केला.सदरची कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सदर कार्यवाहीसाठी श्री. प्रकाश सुतार परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्री. जयराम बावधने वनपाल राजापूर श्री. विक्रम कुंभार वनरक्षक राजापूर यांनी कार्यवाही पूर्ण केली. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणी सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी रत्नागिरी गिरिजा देसाई यांनी केले आहे.



