महाराष्ट्र

कोकणातील धनगर समाजाच्या उन्नतीसाठी संघटितपणे काम करण्याचा कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी केला निर्धार

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली महाराष्ट्र राज्य कोकण प्रदेश युवक आघाडीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई,मुंबई उपनगर, नवी मुंबई या जिल्ह्यातून 51 पदाधिकाऱ्यांची निवड करत कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी कार्यकारणी केली जाहीर

मुंबई दि. २३ – ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली महाराष्ट्र राज्य कोकण प्रदेश युवक आघाडीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई,मुंबई उपनगर, नवी मुंबई(विभाग )या जिल्ह्यातून ५१ पदाधिकाऱ्यांची निवड करत कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी कार्यकारणी केली जाहीर सदर कार्यकारणी राष्ट्रीय अध्यक्ष अजय पाल होळकर व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करत असल्याचे श्री नवलराज काळे यांनी सांगितले. घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर यूट्यूब लाईव्ह द्वारे समाजाला संबोधित करत नवलराज काळे यांनी कार्यकारणी केली जाहीर.

कोकणातील धनगर समाजाच्या उन्नतीसाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार करत संघटनेचे ध्येयधोरण कामाची पद्धत देखील त्यांनी जाहीर केले आहे.

कोकणातील धनगर समाजाच्या उन्नतीसाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार करत खालील मुख्य मागण्या व उपक्रम भविष्यात राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले,वाडी-वस्तींसाठी रस्ते व दळणवळण सुविधा करणे,जातीचे दाखले मिळवण्यासाठी विशेष समितीची मागणी जातीचे दाखले व जात पडताळणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी करणे, काही ठिकाणी घरी आहेत पण घरा खालील जमीन समाजाच्या नावावर नाही घराखालची जमीन धनगर समाजाच्या नावे करण्यासाठी प्रयत्न.

शासकीय योजनेतून जिल्हास्तरीय पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सामाजिक व सांस्कृतिक भवन निर्मितीसाठी प्रयत्नशील तालुकास्तरीय शैक्षणिक वस्तीग्रह किंवा सांस्कृतिक सभागृह निर्मितीसाठी प्रयत्न करणे. केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजापर्यंत पोहोचण्यासाठी महासंघाचे पदाधिकारी काम पाहतील. गावो गावी नेटवर्क सुविधा इतर अडीअडचणी व समाजाच्या मागणीनुसार काही विषयाचे पाठपुरावे महासंघाच्या माध्यमातून करण्यात येतील.

कोकणातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करणे, शैक्षणिक मार्गदर्शन,गुणवंतांचा सन्मान करून कोकणात शैक्षणिक गंगा आणण्याच्या काम महासंघाच्या वतीने करण्यात येईल, शीर सलामत तो पगडी पचास असं धनगर समाजात म्हटले जाते त्यामुळे आपले आरोग्य चांगला असेल तर अनेक गोष्टी करता येतील त्यासाठी कोकणातील समाजाच्या आरोग्यासाठी जनजागृती व उपक्रम ,आरोग्य शिबिर राबवणे. त्याच प्रमाणे राज्यातील धनगर समाज एसटी आरक्षणाचा मुद्दा खूप महत्त्वाचा असून त्या मुद्द्यावरती ही लक्ष केंद्रित करणार सध्या चालू असलेल्या सर्व उपोषणांना आंदोलनाला ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेशच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला असून भविष्यात आरक्षणाबाबत पदाधिकाऱ्याशी मध्ये चर्चा करून पुढील ध्येय धोरण ठरवणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आरक्षणासह समाजाच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी महासंघ कटिबद्ध राहील.

कोकणातील स्थानिक संघटना, मंडळे, संस्था यांना सोबत घेऊन एकत्र काम करण्याचा निर्धार नवलराज काळे यांनी केला आहे तसेच त्यांनी सर्व कोकणवासीयांना आवाहन केलं आहे की आपल्या सोबत जोडले जा व सहकार्य करा येणाऱ्या काळात पुढच्या पिढीसाठी आपण सर्व एकत्र संघर्ष करणे खूप गरज आहे त्यामुळे प्रांतवाद संघटना वाद पोट जातीयवाद बाजूला ठेवून सर्वांनी धनगर म्हणून एकत्र येऊन काम करूया. त्यासाठी महासंघाशी आपण सर्वांनी जोडले जावे असे आवाहन देखील श्री काळे यांनी यावेळी केले. यावेळी समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी तळागाळातील समाज बांधवांच्या संपर्कात राहण्यासाठी आपला भ्रमणध्वनी क्रमांक प्रसिद्धी केला आहे. 📞 9307327434/ 9763475940 आपल्या काही अडचणी असतील तर या नंबर वरती तुम्ही सकाळी यांना संपर्क करू शकता.तसेच काळे यांनी जाहीर केलेली ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेश कार्यकारणी खालील प्रमाणे

कोकण प्रदेशाध्यक्ष– मा श्री नवलराज विजयसिंह काळे (सिंधुदुर्ग)

कोकण प्रदेश उपाध्यक्ष–सचिन ज्ञानदेव धायगुडे (पालघर),नरेश सुरेश कोकरे(रायगड), अमृत अंकुश गोरे (रत्नागिरी), अमोल बाळकृष्ण जंगले (सिंधुदुर्ग)

कोकण प्रदेश सरचिटणीस– गुरुप्रसाद भैरू खरात (मुंबई)

कोकण प्रदेश संघटन सरचिटणीस–संजय कोंडीबा झोरे (ठाणे),मंगेश गंगाराम शिंगाडे (सिंधुदुर्ग)

कोकण प्रदेश चिटणीस –संदीप अशोक माने (ठाणे),मालोजी बऱ्या बोडके (रत्नागिरी)

कोकण प्रदेश खजिनदार–विठ्ठल बिरू लांबोर (रायगड)

कोकण प्रदेश सह खजिनदार –हितेश दाजी बर्गे (मुंबई)

कोकण प्रदेश लेखा परीक्षक–रामचंद्र दशरथ शेळके (नवी मुंबई)

कोकण प्रदेश सहखजिनदार – पांडुरंग बमू गोरे (पालघर),

कोकण प्रदेश सहसंपर्कप्रमुख –संतोष महादेव पटकरे (मुंबई उपनगर)

कोकण प्रदेश संघटन मंत्री–रवींद्र विठ्ठल हिरवे (मुंबई उपनगर),हर्षद विजय फाले (सिंधुदुर्ग)

कोकण प्रदेश कार्याध्यक्ष–प्रकाश पांडुरंग देसाई (ठाणे)

कोकण प्रदेश उपकार्याध्यक्ष –सुरेश रामचंद्र कोकरे (रत्नागिरी)

कोकण प्रदेश मीडिया प्रमुख–बापू सुरेश खरात (ठाणे)

कोकण प्रदेश सहमीडिया प्रमुख –मनोहर रामचंद्र कोकरे (रत्नागिरी)

कोकण प्रदेश प्रसिद्धीप्रमुख –दत्तात्रेय रामा शेडगे (रायगड)

कोकण प्रदेश सह प्रसिद्धीप्रमुख –लक्ष्मण तुकाराम बावदाने (ठाणे)

कोकण प्रदेश कायदेशीर सल्लागार –ॲड मिलिंद नारायण जाडकर (रत्नागिरी) ,ॲड. अविनाश बयाजी शेळके (ठाणे) ॲड योगेश छबिलाल परदेशी (मुंबई)

कोकण प्रदेश सल्लागार–रमेश शांताराम माने (मुंबई उपनगर),धनंजय सुरेश शेळके (रायगड), चंद्रकांत धोंडीराम गावडे (पालघर),किरण कोंडू ढवळे (मुंबई उपनगर),संदीप देऊ जंगले (सिंधुदुर्ग)

कोकणप्रदेश मधील एकूण १० जिल्हा अध्यक्ष व १० जिल्हा सरचिटणीस असे एकूण २० पदाधिकारी कोकण प्रदेश कार्यकारणी सदस्य असतील.

1) ठाणे जिल्हा- अध्यक्ष– सचिन गणपत झोरे, सरचिटणीस–दत्ताराम विठ्ठल शेळके

2)सिंधुदुर्ग जिल्हा- अध्यक्ष– संतोष गंगाराम साळसकर, सरचिटणीस –सूर्यकांत अनंत बोडके

3)मुंबई उपनगर जिल्हा- अध्यक्ष–संतोष तुकाराम जांगळी, सरचिटणीस –ॲड. गणेश मानाजी शेळके

4) पालघर जिल्हा- अध्यक्ष–विजय सिताराम यमकर, सरचिटणीस–संदीप गंगाराम झोरे

5) दक्षिण रत्नागिरी जिल्हा– अध्यक्ष – प्रसाद पद्माकर कोकरे, सरचिटणीस–साहिल रमेश गोरे

6) उत्तर रत्नागिरी जिल्हा- अध्यक्ष– सुनील अशोक आखाडे, सरचिटणीस– मनोहर बाबा ढेबे

7) रायगड(ग्रामीण) जिल्हा- अध्यक्ष– नितीन कोंडीराम महाबळे, सरचिटणीस सुनील प्रदीप झोरे

8) रायगड (शहर)– जिल्हाअध्यक्ष–संतोष रामा शिंगाडे, सरचिटणीस – चंद्रकांत बिरू बावदाने

9) मुंबई जिल्हा – अध्यक्ष–विकास प्रकाश अडुळकर, सरचिटणीस–मंगेश गंगाराम वरक

10) नवी मुंबई – अध्यक्ष– संजय दादासाहेब सातपुते, सरचिटणीस–सतीश सुभाष खरात

वरील ५१ मधून ८ जणांना जिल्हा प्रभारी ची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे

1) सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी अमोल बाळकृष्ण जंगले

2) रत्नागिरी जिल्हा प्रभारी अमृत अंकुश गोरे

3)रायगड जिल्हा प्रभारी नरेश सुरेश कोकरे

4) पालघर जिल्हा प्रभारी पांडुरंग गोरे

5)ठाणे जिल्हा प्रभारी संजय कोंडीबा झोरे

6)मुंबई उपनगर जिल्हा प्रभारी संतोष महादेव पटकारे

7) मुंबई जिल्हा प्रभारी गुरुप्रसाद भैरू खरात

8) नवी मुंबई प्रभारी रामचंद्र दशरथ शेळके

अशी असेल ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली महाराष्ट्र राज्य कोकण प्रदेश युवक आघाडी ची नवीन कार्यकारणी.

नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी हे समाजाच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजोपयोगी कामे करीत आहेत त्यांच्या कार्याचा विस्तार अधिक जोमाने व्हावा व त्यांच्या कार्याची व्याप्ती वाढावी यासाठी त्यांची माझ्या कार्यकारणीत त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. धनगर समाजाचे संर्वधन आणि समाजहिताचे रक्षण या हेतून राष्ट्रीय पातळीवर पोटशाखाभेद प्रांत भेद भाषा भेद बाजूला ठेवून सर्व धनगर समाज एक होत आहेत या राष्ट्रीय प्रवाहात या सर्वांना सामील करून घेऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करावा व त्यांना आणखी कार्यक्षेत्र विस्तारीत व्हावे यासाठी

व समाजाला न्याय मिळावा याकरिता या निवडी जाहीर केल्या आहेत. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी माझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत व ते समाजाच्या हिताचे काम करतील असा विश्वास व्यक्त करत सर्व पदाधिकारी यांना कोकण प्रदेशाध्यक्ष श्री नवलराज काळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे समाज माध्यमातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button