क्रीडामहाराष्ट्र

१२ वी वेस्ट झोन, भोपाल मध्यप्रदेश येथे झालेल्या क्ले पिजन डबल ट्रॅप या खेळ प्रकारात कार्तिकी देवळेकरला दोन रोप्य, एक कांस्य व वरा देवळेकरला दोन कांस्य पदक

६८ नॅशनल चॅम्पियनशिप शॉटगन स्पर्धा 2025 साठी निवड झाली. महाराष्ट्रचे प्रतिनिधित्व करणार

मुंबई दि. २३ :- १२ वी वेस्ट झोन शॉटगन स्पर्धा भोपाळ मध्य प्रदेश येथे १८ ते २२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत झाल्या. वेस्ट झोनमध्ये महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, गुजरात व दु दमन या राज्यातील खेळाडू सहभागी होतात.

कार्तिकी मानस देवळेकर हिला शॉटगन डबल ट्रॅप या खेळ प्रकारात ज्युनिअर वुमन व सिनिअर वुमन या गटात रोप्य व युथ वुमन या गटात कांस्य पदक मिळाले. व वरा मानस देवळेकर हिला ज्युनिअर वुमन व सिनिअर वुमन या गटामध्ये कांस्य पदक मिळाले.

याची ६८ नॅशनल चॅम्पियनशिप शॉटगन कॉम्पिटिशन २०२५  दिल्ली येथे सहभागी होण्यासाठी निवड झाली आहे. त्या क्ले पिजन डबल ट्रॅप या खेळ प्रकारात महाराष्ट्रचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या दोघींना मोहनिष नंदकुमार हिरवे यांनी यश शूटिंग रेंज पेडणे, गोवा येथे प्रशिक्षण दिले.

सिध्दांत रायफल क्लबचे अध्यक्ष विजय खारके, सचिव आणि राष्ट्रीय नेमबाज किसन खारके, सदस्य अलंकार कोळी आणि प्रसिद्ध उद्योजक सौरभ मलूष्टे यांनी दोघीच्या नेत्रदीपक कामगिरी चे कौतुक केले आहे. व पुढील नॅशनल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button