रत्नागिरी

शिष्यवृत्ती परीक्षेत बाणकोट किल्ला उर्दू शाळेचे घवघवीत यश!

रत्नागिरी दि. २६ जुलै : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाणकोट किल्ला उर्दू या शाळेने पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता ४थी) उत्कृष्ट यश संपादन केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार, या शाळेतील चार विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत शाळेच्या आणि गावाच्या नावात भर घातली आहे.

गुणवंत विद्यार्थी

अब्दुल हादी नाडकर : ५४.००%

सलवा पठाण : ५२.६६%

जाहीद बांगी : ४४.६६%

मिदयान नाडकर : ४२.००% प्रमाणे आहेत.

हे चारही विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत, ही संपूर्ण शाळेसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या यशामागे त्यांची कठोर मेहनत, जिद्द आणि शाळेतील शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आहे.

या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री पठाण शाखालीदखान, शिक्षक, ग्रामस्थ आणि पालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या यशामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावला असून, इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button