
दापोली दि. १४ सप्टेंबर :- दापोली शिक्षण संस्था संचालित ए.जी. हायस्कूल विद्या भारती संलग्न विभागाची पश्चिम क्षेत्र विभागीय खेलकुद स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. दि.१३ सप्टेंबर २०२६ छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या मल्लखांब व कबड्डी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.
यामध्ये १७ वर्षाखालील मुले – कबड्डी स्पर्धेत मुलांचा प्रथम क्रमांक आला.
सहभागी खेळाडू – रुद्र जाधव, अवधूत शिगवण, स्वराज जोशी,साई भांबीड, सागर पवार, निर्वाण गोरीवले, ओम वारणकर, जय पांगारकर, करण भैरमकर, सार्थक भांबीड,विराज दाभोळकर, सर्वेश पुलेकर.
मल्लखांब क्रीडा स्पर्धेत –
१७ वर्षांखालील मुली –
१)ऋतुजा दत्ता पवार -द्वितीय क्रमांक,
२)समृद्धी संतोष धाडवे- तृतीय क्रमांक,
३)वेदा प्रदिप खंकाळ -चौथा क्रमांक
१७ वर्षांखालील मुले –
स्वराज संजय मांजरे – तृतीय क्रमांक
१९ वर्षांखालील मुली – पल्लवी विजय भुवड – प्रथम क्रमांक
कबड्डी व मल्लखांब क्रीडा प्रकारातील सर्व विद्यार्थ्यांची निवड विदया भारती अखिल भारतीय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरिता झाली आहे.
वरील सर्व खेळाडूंनी विद्याभारती प्रमुख श्री. शैलेश मिसाळ, क्रीडा शिक्षक श्री. प्रथमेश दाभोळे,कु.आकांक्षा अस्वले, श्री.विजय भुवड,श्री.बडे सर आणि कोकण प्रांताचे खेलकुदचे अध्यक्ष मा श्री. प्रमोदजी पारसी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुयश संपादन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शकशिक्षक यांचे संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रसाद करमरकर, सेक्रेटरी डॉ. विनोद जोशी, शालेय समिती चेअरमन रवींद्र कालेकर, सदस्या सौ.स्मिता सुर्वे तसेच सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद कांबळे, उपमुख्याध्यापक मगदूम एस.आय. पर्यवेक्षक अनिल पेठकर, पर्यवेक्षिका सौ. सोनाली मेहंदळे, विद्याभारती समन्वयक सौ.स्वरदा थोरात, विद्याभारती शिक्षकवृंद सौ.प्रिया पास्ते,श्रीमती.संगीता माने,सौ.मीनल रसाळ,श्री.मयुरेश बने,अमित गुरव तसेच ए.जी. हायस्कूल, दापोली शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.



