रत्नागिरी येथे उद्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आर.पी.आय.(आ)चे वतीने निदर्शने

विल्ये दि. २६ (अमित कांबळे) :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने सोमवार दिनांक २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपवर्गीकरणाच्या विरोधात निदर्शने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे
अनुसूचित जातीच्या १)आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा.
२) बदर आयोग त्वरित रद्द करण्यात यावा.
३) शासनाने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुसूचित जातीच्या सर्व समाज घटकांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करण्यात यावी.
४) जंतर मंतर येथील विद्यार्थ्यांच्या झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून हल्ला करणाऱ्या पोलिसांवर त्वरित कारवाई करण्यात यावी.
५) शासनाने जाहीर केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफीची त्वरित अंमलबजावणी करावी.
तरी रत्नागिरी तालुका व जिल्हा पदाधिकारी जेष्ठ सदस्य युवक कार्यकर्ते यांनी या निदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी आवाहन रत्नागिरी जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) जिल्हाध्यक्ष प्रितमजी रुके, सेक्रेटरी आदेशजी मर्चंडे, रत्नागिरी तालुका अध्यक्ष विलासजी कांबळे , सेक्रेटरी उज्वल कांबळे यांनी केले आहे .



