
जैतापूर दि. २६ जुलै :- राजापूर–लांजा–साखरपा मतदारसंघात विकासकामांच्या जोरावर जनतेचा वाढता विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून, नाटे येथील ठाकरेवाडी, पडवणे, बाणेवाडी, थळेश्री मिराशीवाडी तसेच परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात उभाटा गटाच्या ग्रामपंचायत सदस्या ज्योती मयेकर व प्रांजल लकळे, तसेच उभाटा शाखाप्रमुख चंद्रकांत मिराशी यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षाला बळकटी दिली.
पक्षप्रवेश सोहळ्यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरूप, तालुकाप्रमुख दीपक नागले, पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, जिल्हा परिषद सदस्या कोमल नवाळे, पंचायत समिती सदस्या जान्हवी गावकर, चंद्रकांत पड्यार, रवींद्र नागरेकर गिरीश करगुटकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नाटे गावातील नागरिकांनी आमदार भैय्या सामंत यांच्याशी थेट संवाद साधत गावातील विविध विकासकामे, पायाभूत सुविधा, सार्वजनिक प्रश्न तसेच प्रलंबित कामांबाबत निवेदने सादर केली. प्रत्येक निवेदन गांभीर्याने ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देण्यात आल्या. काही प्रश्नांवर जागेवरच कार्यवाही करण्याचे आदेश देत जनतेची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले.
आमदार भैय्या सामंत यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत अनेक नागरिकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश केवळ राजकीय नसून मतदारसंघाच्या विकासाच्या प्रवासात सहभागी होण्याचा निर्धार असल्याची भावना नवप्रवेशितांनी व्यक्त केली.
यावेळी विभागप्रमुख मनोज आडविलकर, उपविभागप्रमुख प्रेमानंद कलव, रमेशशेठ लांजेकर, संतोष चव्हाण, शाखाप्रमुख विद्याधर कांबळी, अनिल ठाकरे, मंगेश पारकर, अल्केश पवार, संदेश शेठ पाथरे, रोशन डुगीलकर, सचिन कोठारकर, रुपेश मिराशी, बंड्या चव्हाण, दीपक पावसकर, अजय बंदरकर, महिला उपतालुकाप्रमुख प्राजक्ता पांचाळ, अंकिता मयेकर, पूजा करंगुटकर, भार्गवी नार्वेकर, मनीषा पाटील यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या पक्षप्रवेश सोहळ्यात परेश लकळे, गणेश पारकर, अक्षय मयेकर, सिद्धात शेट्ये, विकी शेट्ये, दिवा पेडणेकर, राजेश ठाकरे, प्रसाद आरेकर, मनीष मसुरकर, नितेश ठाकरे, प्रणय कलव, श्रीकृष्ण पेडणेकर, प्रवीण होलम, रवी मयेकर, नितीन करंगुटकर, दीपाली मयेकर, नेहा करंगुटकर, शीतल कलव, सुगंध ठाकरे, पप्या आंबोळकर, यश आंबोळकर, नितेश आंबोळकर, निलेश आंबोळकर, विशाल आंबोळकर, हेमनाथ आंबोळकर, स्वयंम आंबोळकर, सानिया आंबोळकर, सपना ठकरूळ, जगदीश ठकरूळ, संदीप ठकरूळ, सुगंधा आंबोळकर, निशा पवार, विशाखा सातूर्डेकर, दिक्षा वाघे, प्राची कलव, हिराबाई पवार, रुपाली सागवेकर, रेखा प्रजापती, रेखा पवार, सानिया कोठारकर, रेखा नार्वेकर, विशाखा वाडेकर, माधुरी ठाकरे, विजय पारकर, वंदना पारकर, विशाखा पारकर, प्रमिला नार्वेकर, सीताबाई मेळेकर, संदेश आंबोळकर, मयुरी आंबोळकर, राजू गिजम, नितीन घाडी, नितीन बाणे, महेश घाडी, जितू बाणे, लहू साळवी, लहू कानू साळवी, अभिजित थळेश्री, परेश मिराशी, निधी मसुरकर, मेघना ठाकरे, सुधा ठाकरे, भारती कलव, श्रीनिवास हळदणकर, रामदास कलव, जितू शिरवडकर, आंबोळगडचे माजी उपसरपंच शत्रुघ्न वाडेकर, ज्येष्ठ समाजसेवक विश्वासभाई करंगुटकर, अनिल नार्वेकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.
“जनतेचा विश्वास… विकासाचा ध्यास… आणि कामाचा वेगच वेग” या ब्रीदवाक्याला साजेसा हा पक्षप्रवेश सोहळा ठरला असून, नाटे परिसरात शिवसेनेची ताकद आणखी वाढल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



