रत्नागिरी शहर आणि रेल्वे स्टेशन रस्ता परिसरात मोकाट गुरांमुळे प्रवाशी हैराण

विल्ये दि. १२ सप्टेंबर (अमित कांबळे) :- रत्नागिरी शहरातील रस्त्यावर महत्वाच्या वर्दळी ठिकाणी तसेच रेल्वे स्टेशन परिसर खेडशी ते हातखंबा पर्यंत ठीक ठिकाणी मोकाट गुरांनी प्रवाशी वर्गाला त्रस्त केले आहे.त्यामध्ये अनेक गुरं रस्त्याच्या मधोमध बसून असल्याने बस ड्रायवर किंवा प्रवाशी यांना खाली उतरून त्यांना बाजूला करावे लागत आहे. ही अवस्था विविध ठिकाणी असल्यामुळे जे पर्यटक गणपतीपुळे आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी येतात त्यांना हा नाहक त्रास होत आहे.
या प्रवाशी वर्गाच्या या समस्येवर अनेकदा तात्पुरती हालचाल दाखवली जाते. पुन्हा अवस्था जैसे थे असते. त्यामुळे काही मारकुटे बैल प्रवाशांच्या अंगावर येवून गंभीर इजा, त्या धावपळीच्या वेळी इतर ऍक्सीडेन्ट होण्याचा अधिक संभव असतो. म्हणूनच या गंभीर समस्येवर त्वरित दखल घेणे महत्वाचे आहे.अन्यथा येणारे मुबंईकर आणि इतर पर्यटक यांना रस्त्यावरील गुरं हाकलूनच गावाकडे आणि नियोजित ठिकाणी प्रवास करावा लागेल.



